संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- गावात डासांचा नायनाट व्हावा व गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने कामठी तालुक्यातील खैरी गावच्या सरपंच योगीता किशोर धांडे यांच्या नेतृत्वात खैरी गावात कीटकनाशक फवारणी तसेंच फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी करण्यात येत आहे.
गावात स्वाईन फ्लू,टायफाईड व डेंग्यूचा प्रकोप वाढत असताना यावर रोकथाम करण्यासाठी गावात फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी तसेच कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे.यावरून ग्रामपंचायतच्या सरपंच योगिता किशोर धांडे व ग्रामपंचायत प्रशासन गावातील ग्रामस्थांच्या सुदृढ आरोग्यप्रति किती सजग आहेत हे दिसून येते.गावात धुरळणी होत असल्याने डासावर आळा घालणे काही प्रमाणात शक्य होत आहे.