स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

मुंबई :- स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे अध्यक्ष, ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले, सहसचिव शिवदर्शन साठ्ये, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, उपसचिव (विधी) सायली कांबळी, अवर सचिव विजय कोमटवार, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. विधानमंडळाच्या वैशिष्टयपूर्ण वास्तूला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या वास्तूचे सौंदर्य उजळून निघाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Wed Aug 16 , 2023
नवी दिल्ली :- भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते  ध्वजारोहण झाले. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त  तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समूह राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण झाले. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलनही झाले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com