संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, कन्हान पोलीसांची पहिल्यांदा मोठी कारवाई.
कन्हान :- पोलीसांनी रेती तस्करांविरुद्ध पाच वेग वेगळ्या कारवाईत चालक आणि मालका विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून एक कोटी रुपयांहुन अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.२२) फेब्रुवारी ला रात्री ९ ते ११ वाजता दरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आपल्या स्टाफ सह अवैध धंधे कारवाई कामी परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि मनसर कडुन कन्हानच्या दिशेने मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतुक होत आहे. अश्या माहितीवरुन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्टाफ सह तारसा चौक येथे नाकाबंदी केली असता काही संशयित टिप्पर ट्रक क्र. १) एमएच ४० सीटी १७००, २) एमएच ४० सीएम २५२६, ३) एमएच ४९ एटी १८१७, ४) एमएच ४९ बी झेड ४८७३ , ५) एमएच ४९ सीएम ९८०८ हे मनसर कडुन कन्हान च्या दिशेने येतांना दिसले. पोलीसांनी टिप्पर ट्रक ला थांबवुन पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात रेती दिसुन आली. ट्रक चालकास वाळुची राॅयल्टी , वाहनाचे वजन काटा पावती आहे काय ? असे विचारले असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगितल्याने कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपी १) पुरुषोत्तम विष्णु उके (३७) रा. झींझरीया ,२) हमीद अब्दुल बेग (४०), ३) मोहित मुसाफिर यादव (२६) दोन्ही राह. कन्हान, ४) डिलेश आसाराम गौतम (३२), ५) रविंद्र पित्तमसिंह पटले दोन्ही राह. मध्यप्रदेश, ६) शहानवाज सिराज अहमद जाफर (३१) , ७) पंचम गिरीधर भगत दोन्ही राह. कामठी यांना ताब्यात घेऊन त्यांचा ताब्यातुन ३५ ब्रास रेती किंमत १,७५,००० रुपये आणि ५ टिप्पर ट्रक किंमत १,६२,० ०००० असा एकुण १,६३,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला. कन्हान पोलीसांच्या मोठ्या कारवाई मुळे रेती तस्कऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स पोनि रोशन बावनकर, उपनिरीक्षक प्रविण हारगुडे, आकाश सिरसाट, महेश बिसेन, जयलाल सहारे,सम्राट वनप्रती, जीवन वीघे, अनिल यादव सह पोलीस कर्म चा-यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.