नेहरुनगर झोनच्या मालमत्ता कर विभागाचे पाच कर्मचारी निलंबित

मनपा आयुक्तांनी केली नेहरूनगर झोनमध्ये आकस्मिक पाहणी

नागपूर :-  मालमत्ता कर संकलनात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नेहरूनगर झोनच्या पाच कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले. बुधवारी (ता.२१) मनपा आयुक्तांनी नेहरूनगर झोनला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम व सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते. सेवा पंधरवडा अंतर्गत मालमत्ता कर विभागाच्या सेवा नागरिकांना वेळेवर उपलब्ध करणे आवश्यक आहे. सदर कामात या झोनचे पाच कर्मचारी दिरंगाई करतांना निर्दशनास आले. 

नेहरूनगर झोनमधील २१ हजार थकबाकीदार यांची रु. 15.92 कोटीची मालमत्ता कराची वसुलीकरीता स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई न केल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी नाराजी दर्शविली. मा.आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे गैरजबाबदार कर्मचारी जवाहर धोंगडे, स्वप्नील पाटील, हेमंत चामट यांना नामांतरण संबंधीत अर्ज वेळेवर निकाली न काढल्यामुळे थेट निलंबीत करण्यात आले. अशोक गिरी, राजस्व निरीक्षक, अमित दामणकर कर संग्राहक हे दोन्हीही कर्मचारी बिनापरवानगीने गैरहजर होते म्हणून या दोघांनाही निलंबीत करण्यात आले.

तसेच कर विभागाकडून होत असलेल्या कामचुकारपणाबद्दल नेहरुनगर झोनच्या कर विभागाच्या सहायक अधीक्षक अनिल महाजन यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

मालमत्तेचे नामांतरण, कर निर्धारण संदर्भातले प्रलंबित कामे ४८ तासाच्या आत करण्याचेही आदेश त्यांनी दिले. झोन अंतर्गत आयुक्तांनी २१ हजार नागरिकांकडून १५.९२ कोटीचे मालमत्ता कर वसुल करण्यासाठी त्यांची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश दिले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार कामठीत पट्टे वाटप करीता सर्वे सुरु .

Fri Sep 23 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  प्रधानमंत्री आवास योजनेला येणार गती  कामठी :- भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर परिषद प्रशासक उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांना दिलेल्या निर्देशानुसार पट्टे वाटप सर्वे चा अखेर शुभारंभ करण्यात आला नगर परिषद चे माजी विरोधी पक्ष नेते लालसिंग यादव यांच्या नेतृत्वात भाजपा कामठी शहरध्यक्ष माजी नगरसेवक संजय कनोजिया, संध्या रायबोले, प्रतिक पडोळे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!