मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक, ठाणे, वाशिम-यवतमाळ, मुंबई उत्तर पश्चिम, कल्याण या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या जागांवर तिढा असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आहे.
शिवसेनेच्या (शिंदे गट) पहिल्या यादीतील 8 उमेदवारांची नावं
- मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
- कोल्हापूर – संजय मंडलिक
- शिर्डी – सदाशिव लोखंडे
- बुलढाणा – प्रतापराव जाधव
- हिंगोली – हेमंत पाटील
- रामटेक – राजू पारवे
- हातकणंगले – धैर्यशील माने
- मावळ – श्रीरंग आप्पा बारणे