प्रथमत: नागपुर ग्रामिण आष्टे-डु आखाडा शालेय क्रिडा स्पर्धेत पारशिवनी तालुका प्रथम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – महाराष्ट्र शासन क्रिडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व जिल्हा क्रीडा परिषद नागपुर व नागपुर जिल्हा ग्रामिण आष्टे-डु आखाडा असोसिएशन यांच्या द्वारे आयोजित नागपूर जिल्हास्तरीय शालेय आष्टे-डु आखाडा स्पर्धा- २०२२ -२३ वयोगट- १४, १७, १९ वर्षा आतील मुले व मुली प्रकार- शिवकला, हस्तकला, मर्दानी कला, पदसंतुलन, स्पर्धा (दि.१९) नोव्हेंबर २०२२ ला तालुका क्रिडा संकुल रामटेक जि. नागपुर येथे आष्टे-डु अखाडा शालेय स्पर्धा नागपुर जिल्हा क्रिडा अधिकारी नागपुर यांच्या नेत्रुत्वात स्पर्धा संपन्न झाल्या.

यात साईनाथ विद्यालय बोरडा चे क्रिडा शिक्षक राजु बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात १) सुरक्षा वैद्य ने स्वर्ण पदक, २) नैतिक बोरकुटे ने स्वर्ण पदक, ग्रामिण विकास विद्यालय साल वा चे क्रिडा शिक्षक सुळके यांच्या मार्गदर्शनात १) प्रांकेत नागपुरे ने स्वर्ण पदक, २) समीक्षा नागपुरे ने स्वर्ण पदक, ३) प्रणव ठाकरे ने स्वर्ण पदक, इंदिरा गांधी कनिष्ट महाविद्यालय कन्हान च्या क्रिडा शिक्षिका सिंगाडे यांच्या मार्गदर्शनात १)  छकुली बावणे ने स्वर्ण पदक, २) सावी वकलकार ने स्वर्ण पदक, सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज कामठी च्या क्रिडा शिक्षिका मल्लिका नागपुरे यांच्या मार्गदर्शनात १) हर्ष रमाकांत मलेवार ने स्वर्ण पदक, २) प्राची टाकळखेडे स्वर्ण पदक, ३) श्री नरेंद्र तिडके कनिष्ट महाविद्यालय रामटेक चे क्रिडा शिक्षक  वाघमारे यांच्या मार्गदर्शनात १) गौरव राजेंद्र बावणे ने स्वर्ण पदक पटकाविले आहे. या प्रथमत:च झालेल्या आष्टे-डु अखाडा शालेय स्पर्धा राजु बाबा कवरे सचिव नागपुर जिल्हा ग्रामिण व  मोहन वकलकार प्रशिक्षक नागपुर जिल्हा  हयानी पंच म्हणुन कामगिरी बजावली. पारशिवनी तालुक्यातील विद्यार्थ्यानी प्रथम स्थान पटकाविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिंदुस्तान कंपनीची जागा साप्ताहिक व गुजरी बाजार, बस स्थानक करिता देण्याची मागणी

Mon Nov 21 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन.   कन्हान :- शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील बंद असलेली हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा विकल्या नंतर त्या जागेवर वाढीव दराने शहर आणि सिटी प्रमाणे विक्री करीत असल्याने स्थानिक दुकानदारांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने दुकांनदारांनी नप मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांची भेट घेऊन, चर्चा करून त्यांना निवेदन देऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com