– उमेदवार अथवा अधिकृत खर्च प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन
नागपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील निवडणूक लढविणा-या उमेदवारांची प्रथम खर्च लेखे तपासणी 7 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
विधानसभा मतदार संघ नागपूर-दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम व नागपूर उत्तर (अ.जा) मतदार संघातून निवडणूक लढविणा-या उमेदवाराची खर्च लेखे तपासणी गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळात बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे होणार आहे.
तसेच विधानसभा मतदार संघ काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी व रामटेक मतदार संघातून निवडणूक लढविणा-या उमेदवाराची खर्च लेखे तपासणी गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळात सरपंच भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी / खर्च प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय खर्च सनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.