
संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी
– नगर विकास विभागाने काढली येरखेडा नगरपंचायतीची अधिसूचना
– गावकऱ्यांनी जल्लोष करून स्वागत
कामठी, ता.प्र ११ : महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने आज ११ फेब्रुवारी रोजी येरखेडा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना जाहीर करून अखेर येरखेडा नगरपंचायत घोषीत केल्याने येरखेडा येथील गावकऱ्यांच्या वतीने जल्लोष करून स्वागत केले.
नगर नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळण्यासाठी गावकऱ्यांचे मागील काही महिन्यापासून प्रयत्न सुरू सुरू होते गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना निवेदन देऊन यरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत च्या दर्जा मिळण्याची मागणी केली होती. डॉक्टर विपिन जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेत येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला विशेष विशेष ग्रामसभा बोलून नगरपंचायतीच्या ठरावा संदर्भात माहिती देण्यास सांगितले होते.
ग्रामपंचायतचे सरपंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ग्रामसभा न बोलविल्यामुळे नगरपंचायतीच्या प्रस्ताव धूळ खात पडला होता. सरपंच यांच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या आदेशाविरोधात गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर २८ दिवस धरणे आंदोलन केले व जिल्हाधिकाऱ्याला नगरपंचायत नगरपंचायत ची मागणी रेटून धरली होती जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम विकास अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार कामठी, जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्याकडून येरखेडा नगरपंचायत संदर्भात लोकसंख्या व भौगोलिक रचना ,नागरी सुविधेचा प्रस्ताव नगरी विकास मंत्रालयाकडे पाठविला असता नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव अनिरुद्ध जेवढीकर यांनी राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ (अ) चे पोट कलमनुसार येरखेडा ग्रामपंचायतचे ग्रामीण क्षेत्रातून नागरिक क्षेत्रामध्ये संक्रमित करण्याची अधिसूचना जारी करून येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत बनविण्याबाबत ४ ऑक्टोंबर रोजी अधिसूचना जारी केली होती. अधिसूचने संदर्भात गावातील ज्या नागरिकांना आक्षेप घ्यायचे असेल त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एक महिन्याच्या काळात आक्षेप नोंदविण्याचे अधिसूचनेत सांगितले होते त्यानुसार आक्षेपांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने आज ११ फेब्रुवारी रोजी येरखेडा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना जाहीर करून अखेर येरखेडा नगरपंचायत घोषीत केले. या आदेशानुसार नव्याने घाटीत नगरपंचायतची यथोचित रचना होईपर्यंत अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी कामठी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. नगर विकास मंत्रालयाच्या वतीने येरखेडा नगरपंचायती अधिसूचना जारी करताच गावकऱ्यांचे वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप तालुका अध्यक्ष उमेश रडके यांचे आभार मानत ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी भाजप पदाधिकारी ऍड आशिष वंजारी, कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र गवते, माजी सरपंच मनीष कारेर्मोरे, मंगला कारेर्मोरे, उपसरपंच मंदा महल्ले पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश दाहाट, प्रिया दुपारे ,नरेश मोहबे ,जयश्री धीवले ,अनिल भोयर, ज्योती घडले, आचल तिरपुडे ,कुलदीप पाटील, चेतन खडसे, राजेश पिपरेवार, ईश्वरसिंग चौधरी, राजेंद्र चौरे, गजानन तिरपुडे, भूषण पाटील, जया भस्मे, शितल चौधरी, सुषमा राकडे ,सरिता भोयर, रेणुका गुजेवार, वनिता नाटकर ,सुनिता आगाशे , रेखा मराठे, प्रवीण आगाशे, शुभम चौधरी, जॉनी भस्मे, कुबेर महल्ले, विशाल वाटकर,मुकेश कनोजिया, यश पाटील, राम देशमुख, कुमकुम यादव, प्रीती देशमुख, कुणाल गड्डमवार सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
Wed Feb 12 , 2025
अरोली :- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार खात येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या 12 फेब्रुवारी बुधवार ला सकाळी साडेअकरा ते पाच वाजेपर्यंत शासकीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मौदा तालुक्यातील खात मंडळ अंतर्गत येत असलेल्या खा त तांडा धर्मापुरी घोटमुंडरी निहार वाणी गावातील सर्व नागरिकांकरिता नागरिकांचे अर्ज स्वीकारणे नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्र देणे नागरिकांकडून शिबिरात प्राप्त अर्जावर […]