कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती ,खात -रेवराल जि .प .व रेवराल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजोली गावचे सरपंच परमधमैय्या मैनेनी यांना आज अप्पर जिल्हाधिकारी तूषार ठोंबरे यांनी अपात्र घोषित केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले आले.
मैनेनी यांनी सरपंच पदासाठी राखीव जागेवर निवडणूक लढवली होती. ही निवडणूक 20 नोव्हेंबर 2022 ला झालेली होती व त्या निवडणूकीत ते विजयी झालेले होते. राखीव जागेवरील विजयी उमेदवारांना त्यांचे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत राज्य निवडणूक आयोगाला सादर करावे लागते ,परंतु त्यांनी ते सादर केलेले नव्हते. याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पोटभरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे आज तुषार ठोंबरे यांनी मैनेनी यांना अपात्र घोषित केले. त्यामुळे आजपासून राजोलीचे सरपंच पद रिक्त झालेले आहे.