अखेर कामठी नगर परिषद च्या वाढीव कराला स्थगिती..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-12 नोव्हेंबर ला पुकारलेल्या कामठी बंद आंदोलनाचा ठरला फुसका बार

कामठी ता प्र 8 :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात मागील काही दिवसापासून कामठी नगर परिषद ने केलेल्या करवाढ विरोधात नागरिकांत नगर परिषद प्रशासनाविरोधात नाराजगीचा सूर वाहत होता. यावर कामठी शहरातील भाजप,कांग्रेस,एमआयएमआईएम, बसपा, आम आदमी पार्टी , बरीएम यासारख्या विविध राजकीय संघटनेतर्फे नागरी हितार्थ वाढीव कराच्या विरोधात नगर परिषद प्रशासनाला वेठीस धरून धारेवर आणले होते मात्र मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी या सर्वांना प्रतिउत्तर देऊन कर वाढ ही शासनाच्या नियमाप्रमाणे व सभेने ठराव मंजूर केल्याप्रमाणे करण्यात आली आहे.त्यातही कुणाला आक्षेप असल्यास यावर 11 नोव्हेंबर पर्यंत आक्षेप मागितले आहेत त्या आक्षेपांची सुनावणी होऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुचविले होते मात्र इतर राजकीय संघटनांनी या करवाढीला स्थगिती देऊन आगामी निवडणुकीत निवडून येणाऱ्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सभेत सदर प्रस्ताव ठेवून योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी मागणी रेटून धरली होती .मात्र मुख्याधिकारी या मागणीला मान्य करीत नसल्याने इतर सर्व राजकीय संघटनांनी सर्वदलीय पक्षातर्फे 12 नोव्हेंबर ला कामठी बंद आंदोलनाचा पवित्रा दिला होता तेव्हा अशा परिस्थितीत येथील नागरिक आणि नगर परिषद प्रशासन यांच्यातील सामंजस्य घडून यावा व विषय मार्गी लागावा तसेच शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होवो यासाठी विकासपुरुष नेतृत्व असलेले आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार टेकचंद सावरकर यांनी आज सायंकाळी 5 दरम्यान नागरिक तसेच पक्षीय पदाधिकारी व नगरसेवक यांच्या मुख्य उपस्थितीत मुख्याधिकारी संदीप बोरकर तसेच कर अधीक्षक आबासाहेब मुंडे यांच्याशी भेट घेत त्यावर चर्चात्मक तोडगा काढून वेळीच जिल्हाधिकारीशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून विषयात्मक परीस्थितीशी अवगत केले .यावर सदर करवाढीचा विषय येत्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सभेत मांडून यावर निर्णय घ्यावा तोवर या करवाढीच्या विषयाला स्थिगिती देण्याचे सांगण्यात आले यावर मुख्याधिकारी ने सहमती दर्शविली त्यानुसार नागरिकांचा वाढीव कराच्या मुद्दाला सद्यस्थितीत स्थगिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे आता 12 नोव्हेंबर ला होणाऱ्या कामठी बंद आंदोलनाचा फुसका बार ठरल्याचे दिसून येते.

उल्लेखनीय आहे की कामठी नगर परिषद ला मिळकत असलेल्या विविध संग्रहित करातून कामठी नगर परिषद चा कारभार सुरू असतो .मागील 2012 पासून कामठी नगर परिषद तर्फे दर चार वर्षांनी होणारी असेसमेंट प्रक्रिया न राबविल्याने घरकरातील वाढ ही नगण्यच होती .यावर घरकर वाढविणे हे नगर परिषद च्या विचाराधीन होते त्यातच 9 ऑक्टोबर 2020 अनव्ये नगर परिषद प्रशासन संचालणालय मुंबई च्या वतीने कामठी नगर परिषद ला आलेल्या पत्रांनव्ये भांडवली मूल्यावर कराची आकारणी करावयाची असून कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करावे असे आदेशीत केले होते त्यावर सभेची मंजुरी घेण्यासाठी 18 जानेवारी 2020 व 3 नोव्हेंबर 2020 ला सर्वसाधारण सभेत तसेच 21 डिसेंबर 2021 च्या विशेष सभेत विषय मंजूर करून ठरावाला प्राप्त मंजुरी नुसार असेसमेंट करून करवाढ करण्यात आली ही करवाढ मालमत्ता धारकतील नझुल, पक्के मकान तसेच वाणिज्य इमारती ,आदींवर लावण्यात आले. त्यातच एकदम दहा वर्षानंतर होणारी घरकरवाढ ही मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले तसेच आलेल्या फेर कर आकारणी नोटीस मध्ये बरेच ठिकाणी घराचे मूल्यांकन हे मोठ्या प्रमानात दर्शविले असून मोठी करवाढ झाली आहे तसेच बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कर आकारणी झाल्याचे निदर्शनास आल्यावरून ही करवाढ नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली असल्याचा आरोप करीत येथील सर्व पक्षिय लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाचा विरोध करून घरकर पूर्ववत पद्धतीनेच लागू करावा व नव्या कर आकारणीला पुढच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सभेत ठेवून विचार विनिमय करण्यापर्यंत स्थगिती देण्यात यावी अन्यथा 12 नोव्हेंबर ला कामठी बंद आंदोलन करणार असा ईशारा देण्यात आला होता.

आज माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी सर्व नागरिक तसेच पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुख्य उपस्थितीत मुख्याधिकारीशी केलेल्या चर्चेतून अखेर या करवाढीला स्थगिती देण्यात आली असून हा विषय पुढच्या भावी नगरसेवकांच्या उपस्थित होणाऱ्या सभेत ठेवण्यात येईल असे सांगून पूर्ववत पद्ध्तीने कर लागू होणार असल्याचे सांगण्यात आल्याने सर्व नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.व या निर्णयाचे स्वागत करून आमदार बावनकुळे तसेच आमदार टेकचंद सावरकर यांचे मनपूर्वक आभार मानत त्यांचा जयघोष करण्यात आला.

याप्रसंगी उद्योगपती अजय अग्रवाल, भाजप कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया,लाला खंडेलवाल, नगरसेविका सुषमा सीलाम, नगरसेविका संध्या रायबोले,पिंकी वैद्य,नगरसेवक लालसिंग यादव, नगरसेवक प्रतीक पडोळे,विजय कोंडुलवार, प्रमोद वर्णम, पंकज वर्मा, माजी नगरसेवक कपिल गायधने,उज्वल रायबोले,पुष्पराज मेश्राम,राजू बावनकुळे,अजय पाचोली,आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

किरनापुर येथे मंडई उत्सव खडा तमाशा रंगला, शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार

Tue Nov 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रामटेक तहसील अंतर्गत किरनापुर, काचुरवाही येथे ग्रामवासी तर्फे दिवाळीच्या शुभपर्वावर नुकतेच मंडई उत्सव निमित्त येथे खडा तमाशा ज्येष्ठ शाहीर माणिकराव देशमुख यांची खडी गम्मत द्वारे लोककलेतुन समाज प्रबोधन करण्यात आले . यावेळी भारतीय कलाकार शाहिर मंडळचे केंद्रीय अध्यक्ष आकाशवाणी,कॅसेट सिंगर शाहीर राजेंन्द्र बावनकुळे चे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मुर्तीचीन्ह देवून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!