अंतीम यादी प्रसिद्ध : जिल्ह्यात 47 हजार 506 मतदारांची वाढ

Ø जिल्ह्यात 22 लाख 25 हजारावर मतदार

Ø एक हजार पुरुष मतदारांमागे 952 महिला 

यवतमाळ :- दुसऱ्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दिनांक १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत अंतीम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादी मतदारांच्या माहितीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे. मतदारांनी यादीत आपल्या नावाचा योग्य प्रकारे समावेश झाला आहे की नाही हे तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार यादीतील कोणतेही दोष किंवा चुका असतील तर आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा स्थानिक निवडणूक विभागाशी संपर्क साधावा. अंतीम यादीमध्ये समाविष्ट असलेल्या नावांच्या आधारावरच येत्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. अंतीम यादी जिल्हा निवडणूक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, सर्व मतदान केंद्रांवर तसेच निवडणूक आयोग व जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

नागरिकांना आपली नावे मतदार यादीत आहेत किंवा नाही याबाबत VOTER HELPLAIN APP तसेच VOTERS’ SERVICE PORTAL यावर देखील तपासता येईल. मतदारांनी आपली नावे मतदार यादीत तपासावीत जेणेकरून निवडणुकीच्या दिवशी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

आज प्रसिद्ध झालेल्या अंतीम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण २२ लाख २५ हजार ६५ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३९ हजार ८६७ पुरुष मतदार, १० लाख ८५ हजार १३८ महिला मतदार तर ६० तृतीयपंथी मतदार आहेत. लोकसभेच्या तुलनेत या यादीत ४७ हजार ५०६ मतदारांची वाढ झालेली आहे. सर्वाधिक ३ लाख ६६ हजार ५६० मतदार यवतमाळ विधानसभा मतदारसंघात असून सर्वात कमी २ लाख ८३ हजार ५४१ मतदार वणी विधानसभा मतदारसंघात आहेत.

सदर पुनरीक्षण कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला मतदारांनी मतदार नोंदणी केलेली असल्याने एक हजार पुरुष मतदारांच्यामागे महिलांचे प्रमाण ९५२ इतके वाढलेले आहे. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ४४ हजार ३८६ मतदार आहेत तर दिव्यांग मतदार १६ हजार १४० इतके आहेत, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PDKV allows private developer to turn Botanical Garden into concrete jungle

Sat Aug 31 , 2024
Nagpur :-Dr Panjabrao Deshmukh Krushi Vidyapeeth (PDKV), which was given land by the state government for conducting agricultural research, is busy minting money by virtually selling these lands. Earlier, it had handed over the Telangkhedi Garden and Satpuda Botanical Garden to a private developer, who banned entry of citizens and now it has allowed the developer Manish Mehadia to turn […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com