प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची कामठी तालुक्यातील प्रगतिशील गावांना क्षेत्रभेट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर वनामती येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी (गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी), यांनी नुकतेच कामठी तालुक्यातील प्रगतिशील गावात समावेशक असलेल्या ग्रामपंचायत कापसी बु., कढोली व महालगाव या तीन गावाला क्षेत्रभेट दिली.

या क्षेत्रभेटीत सदर अधिकाऱ्यांनी कढोली गावाला भेट दिली असता गावाला उंच शिखरापर्यंत नेऊन गावाचे नावलौलीक करनारे व गावात विकासकामांचा फेरा वाढवून गावात विविध सोयीसुविधा करीत गावाचा कायापालट करणाऱ्या माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी गावातील विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकासकामांची माहिती देत योग्य ते मौलिक मार्गदर्शन केले .यावेळी क्षेत्रभेटीत उपस्थित अधिकाऱ्यांना तिनही ग्रामपंचायत मधील विविध योजनाची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली. तसेच या तिन्ही ग्रामपंचायतमध्ये विविध योजना अंतर्गत झालेल्या वर्मी कंपोस्ट प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन बाबत कामे, डिजिटल अंगणवाडी, नरेगा अंतर्गत कामे, मोक्षधाम, रुर्बन अंतर्गत कामे, व इतर कामानां भेटी दिल्यात. तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विविध योजनाची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले,कढोली ग्रा प च्या माजी सरपंच प्रांजल वाघ, विद्यमान सरपंच लक्ष्मण करारे ,उपसरपंच महेश कुपाले,ग्रा प सदस्य राकेश गावंडे,मीनाक्षी ठाकरे, गोविंदा ठाकरे,बबन वानखेडे, आरती घुले,इंदिरा रंगारी, छाया ढोके,संगीता चौधरी,तंटामुक्त अध्यक्ष अरुण शहाणे,माजी तंटामुक्त अध्यक्ष शंकर घुले,भारत महल्ले,साबळे,वसंत वराडे, राजेश वाघ,विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे,ग्रामसेवक ब्रह्मानंद खडसे,सचिन ठाकरे आदींनी उपस्थिती दर्शविली होती.तसेच कापसी बु व महालगाव ग्रा प प्रशासनातर्फेही गावाची विशेष माहिती देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील उमरी गावात किसान गोष्ठी कार्यक्रम

Mon Mar 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील मौजऻ उमरी येथे बंडूजी लेंडे यांच्या शेतात सकाळी ११.०० वाजता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत क्षेत्रीय दिवस/ क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी ,नागपूर चे कुसळकर यांनी विविध विषयावर विविध पिकावर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!