कामठी तालुक्यातील उमरी गावात किसान गोष्ठी कार्यक्रम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील मौजऻ उमरी येथे बंडूजी लेंडे यांच्या शेतात सकाळी ११.०० वाजता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत क्षेत्रीय दिवस/ क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी ,नागपूर चे कुसळकर यांनी विविध विषयावर विविध पिकावर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना मार्केटिंग बाबत तसेच नोगा कंपनी बाबत माहितीदेत विक्रीबाबत सुदधा माहिती दिली. तसेच पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय नागपूरचे बिरादार यांनी विविध पिकावर रोग व किडींची माहिती देत वाढीच्या अवस्थेत करावयाचे नियंत्रण पिकाची अदलाबदल, तेलवर्गीय पिकाची लागवड करणे, पिकाची काढणी व हाताळणी व विक्री व्यवस्था बाबत मार्गदर्शन केले . अदामा ग्रुपचे (एजीएम ) अशोक यादव यांनी जमिनीची निवड करून योग्य पिकाची निवड करून लागवड करावी व नवीन वाणाची निवड करून प्रक्रिया करून तसेच एनपीके नत्र स्फुरद पलास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व शत्रू कीड मित्र कीड याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना इंतर्भूत माहिती दिली .तर चौधरी यांनी शेतकऱ्यांना विविध पिकाबद्दल माहिती देऊन विकेल ते पिकेल आणि कोणता शेतमाल शेतात लावल्यावर फायदा मिळेल, तसेच नगदी पीक लावणे बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व सेंद्रिय शेती बाबत व शेतकरी गटाचे महत्त्व समजून सांगितले .पवार यांनी नोगा कंपनीला लागणाऱ्या मालाची गुणवत्ता व करार बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच त्याचे हमीभावा बाबत सविस्तर सांगण्यात आले व प्रगतशील शेतकरी सेवक उईके यांनी फार्मर प्रोडूसर कंपनी बाबत योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले शेतकऱ्यांनी एकत्र यावे एकत्र शेती करावी आणि आपल्या एफ पी ओ कंपनीचा विकास कसा करावा व आपल्या कामठी तालुक्याचा विकास कसा करावा याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. तालुका कृषी अधिकारी कामठी चे मंजुषा राऊत यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती शेततळे पी.एम .एफ इ.योजना ,संत्रा पिक लागवड मोसंबी फळ व फळपीक लागवड फुलपीक लागवड अशा विविध योजनांची माहिती सविस्तर दिली. तसेच वडोदा मंडळचे मंडळ कृषी अधिकारी सुहास अंबुलकर यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली तसेच वडोदा मंडळाचे सुपरवायझर मनीष मालोदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोंडाने यांनी केले. कार्यक्रमाला कर्मचारी वर्ग , आत्मा कर्मचारी व कामठी तालुक्यातील गावातील शेतकरी प्रगतशील शेतकरी शेतकरी मित्र, शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य ,सचिव ,गटातील लोक ,फार्मर प्रोडूसर कंपनीतील डायरेक्टर ,या कार्यक्रमाला उपस्थित होते .प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com