संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना मंत्रीपदावरून त्वरित बरखास्त करणे व अन्य चार मागण्याला घेऊन लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी कामठी तहसील कार्यालयासमोर 14 तारखेपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मैत्रेय उद्योग समूहाच्या चेअरमन वर्षा सतपालकर यांना त्वरित अटक करणे, शासनाच्या ताब्यात असलेल्या प्रॉपर्टीच्या त्वरित लिलाव करून फसवणूकदारांना त्यांचे पैसे परत कराणे, सगळ्या फसवणुकीच्या केसेस गुन्हेगारी कायद्या अंतर्गत चालविण्यात याव्या ,इत्यादी मागण्याला घेवून भाऊसाहेबांचे उपोषण सुरू आहे. लोकाधिकार परिषदेच्या महासचिव मायाताई उके यांनी प्रसिद्धी पत्र जाहीर करून म्हटले की,हिवाळी अधिवेशन 2022 ला लोकाधिकार परिषदेने विधानसभेवर मोर्चा नेला होता. मोर्चाच्या शिष्टमंडळाचे निवेदन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतले व हिवाळी अधिवेशन 2022 संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस , वित्तमंत्री अजित पवार व लोका धिकार परिषदेचे प्रतिनिधी अशी संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन शंभूराजे देसाई यांनी दिले होते परंतु वर्षभरात शंभूराज देसाई यांनी उपरोक्त बैठक लावली नाही व त्यांची लोकाधिकार परिषदेच्या प्रतिनिधींनी अनेकदा नुसते टाळाटाळ करत राहिले याचा अर्थ शंभूराज देसाई यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाला खोटे आश्वासन दिले होते. दोन कोटी महिलांची फसवणूक होते व राज्याचे मंत्री खोटे आश्वासन देतात म्हणून अशा खोटारड्या मंत्र्याला मंत्री पदावरून बरखास्त करणे ह्या मुख्य मागणी साठी किशोर गेडाम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. माया उके ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठ ते दहा निवेदन देण्यात आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच निवेदन देण्यात आली. राज्याचे राज्यपाल यांना चार निवेदन देण्यात आली. राज्याचे वित्तमंत्री अजित दादा पवार यांना दोन निवेदन देण्यात आली. दोन कोटी महिलांची फसवणूक होते व त्यावर सरकार चर्चा करायला तयार नाही म्हणून राज्य सरकारने लोकाधिकार परिषदेने हे आंदोलन सुरू केले आहे. आपल्याला आठवण असेल मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीने आरडी,एफडी च्या नावाखाली एजंटच्या माध्यमाने पैसा गोळा केला. ज्या लोकांकडून मैत्रेय च्या प्रतिनिधींनी पैसा गोळा करून कंपनीमध्ये जमा केला ते लोक आज प्रतिनिधींच्या घरी पैसे मागायला येतात त्यामुळे मैत्रेय संमुहातील महिला प्रतिनिधी आर्थिक संकटात आहेत. मैत्रेय उद्योग समूहामध्ये काम करणाऱ्या 2 कोटी महिला प्रतिनिधी होत्या. दोन कोटी महिलांची फसवणूक होते व अशा गंभीर विषयावर राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री चर्चा करायला तयार नाही हे अत्यंत गंभीर बाब आहे. 2 कोटी 16 लाख लोकांची फसवणूक झाली व 2500 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा झाला. या प्रकरणांमध्ये मैत्रेय उद्योग समूहातील 350 गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी आत्महत्या केल्या आहेत, कितीतरी नवऱ्याने आपल्या बायकांना माहेरी आणून सोडले, लोकं घरी पैसे मागायला येतात म्हणून कितीतरी महिला घरून बेपत्ता आहेत. अशा महिलांना न्याय मिळावा म्हणून लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम यांनी हिवाळी अधिवेशन चे निमित्त साधून नागपूर पासून 12 किलोमीटर अंतरावर कामठी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी वेगवेगळ्या दिवशी येऊन उपोषण मंडपामध्ये शामील होतात. आंदोलनामध्ये लोकाधिकार परिषदेच्या महासचिव माया उके, राज्याचे सचिव प्रवीण रोगे, मंगला हांडे, विनायक पोवळे, गौरी सदावर्त, सिंधु पाचोळे, लता तामसेटवार , कौशल्या बघेले, तेजस्विनी भगत सोनवणे, कलावती नळे, शालिनी पाटील, सोनाली नगराळे, अनीता गुजरकर, रेखा मेश्राम, हेमंत करंडे, सविता टेंभुर्णे, रजनी मेश्राम, सत्यभामा खोब्रागडे, अरुणाताई भगत, पल्लवी देशभरतार, मौननाथ मेश्राम, कमल निखाडे, आदींनी सहभाग घेतला.