भंडारा :- भंडारा जिल्हा हा मोठया प्रमाणात शेती करणारा असून भंडारा व पवनी या तालुक्यासोबत संपुर्ण भंडारा जिल्हयातील शेतकर्यांनी केलेल्या ई पीक मध्ये नोंदणी सातबारा मध्ये नोंद होत नसल्याने शेतकर्यांना धान केंदावर धान विक्री करीता मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकर्यांना आत्महत्या करण्याची पाळी येण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना ई पिक नोंदणीची मुदतवाढ देण्यात यावी जेनेकरुन शेतकरी आत्महत्याचा कुढलाही पाऊल उचलण्याचा विचार देखील करणार नाही.
तरी ईपीक नोंदणीला मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन उभारण्यात येईल. याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेण्यात यावी पवनी तालुक्यातील अडयाळ येथील साझ्यातील शेतकरी पवनी तालुक्यातील अडयाळ येथील साझ्यातील शेतकर्यांची ईपीक नोंदणी पासून वंचीत असलेल्यांची यादी अडयाळ -५१९, पेंढरी- २७, केसलवाडा-३९, मिर्सी-१२३, उमरी-३५, कातुर्ली-०३, पिलांद्री- १२, कोदुर्ली-०३, नेरला -१२७, कलेवाडा-२०५, उमरझरी-१७, केसलापुरी-१३३, खेरी-मिर्सी-२९, भिकारमिन्सा-२२, पन्नासी-३०, भिवखीडकी-०८, तावेखनी-२७, शेंगाव-११.परीसरातील ८३०.३९ हे.आर. शेती लाभापासून वंचित राहील्यास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे सदर मागणीवजा निवेदन जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आले.
निवेदन देतांना भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, भंडारा तालुकाध्यक्ष ईश्वर कळंबे, पवनी तालुकाध्यक्ष कुणाल पवार, विधानसभा उपाध्यक्ष नितीन तलमले, ओबीसी जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, भंडारा शहराध्यक्ष बबन भुते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.