मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी, पोलीस, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली गणरायाची आरती

मुंबई :- मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने वातावरण भारावून गेले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांनी वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. हिंगोली जिल्ह्यातील लोहारा येथील काही शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते गणपतीची दुपारची आरती करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची घरे, शेती पूर्णपणे वाहून गेली. त्यासंदर्भात बालाजी आढळकर, सखाराम बोडके, उमेश चव्हाण हे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपुस करीत त्यांना दिलासा दिला.

यावेळी वर्षा निवासस्थानी कर्तव्यावर असलेले पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते देखील यावेळी आरती करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Union Home Minister Visited Chief Minister's Varsha Residence and had Ganraya's Darshan

Tue Sep 10 , 2024
Mumbai :- Union Home Minister Amit Shah visited Chief Minister’s Varsha residence today and had Darshan of Ganaraya. On this occasion, Chief Minister Eknath Shinde welcomed Home Minister Shah. Home Minister Shah performed Ganpati Aarti. On this occasion, Chief Minister Shinde and MP Dr. Shrikant Shinde honored Union Home Minister Shah with a shawl and Shrifal. He was also gifted […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com