अमरदीप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी व धरणाच्या पाण्याने संपूर्ण जिल्ह्यात धान पिक व घराची पडझड, काही प्रमाणात गुरेढोरे व पोल्ट्री फार्म शेतकरी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण अद्याप हि पुर्णपणे शेतीचे पंचनामे तलाठी कडून झाले नाही. उलट शेतकरी वर्गाला तऱास दिने सुरू केले आहे. शासनाकडून पंचनामे33 टक्के च्या वर ३३ टक्के च्या खाली करण्याचे आदेश असुन काही तलाठी, कुर्षीसेवक, यांनी शासनाचे परीपत्रक नसतानाही आपल्या मर्जी ने शेतकरी कडुन स्वयंघोसना पत्रक ची मागनी करुन कि आ्म्ही धान पिक आधार भुत केंद्रात विक्री करणार व जमीन पडीत असल्याचे बळजबरीने शेतकरी कडून घेत असल्याचे शेतकरी कडून आरडाओरड सुरू आहे.वैनगंगा नदीचे सोडलेल्या धरणाच्या पाणी शेतात शिरले व धान पिक तीन ते चार दिवस पाण्यात बुडून राहिले. धान पिक सडुन नष्ट झाले. आजही नाल्या किणाऱ्यावरील शेती पाण्याखाली आहे. तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या बोंडरानी अर्जुनी, सावरा,पिपरीया,चांदोरी खु,बिहीरीया,इंदोरा बु,गोंडमोहाळी,अत्री,बोदा, करटीबु, मरारटोला, कवलेवाडा,घाटकुरोडा, बिरोली, चांदोरी बु,पाटील टोला, घोघरा,सालेबडी,धादरीउमरी,लोधिटोला,गराडा, चिखली,खमारी, नांदलपार, खुर्शीपारबेरडीपार व इतर गावातील शेतकऱ्याचे धान पिकाचे नुकसान झाले.तरीही प्रशासन चे अधिकारी सज्ज असले तरी तलाठी कर्मचारी कुंभकरणी झोपेत आहेत परसवाडा मंडळात अजूनही पंचनामे झाले नाहीत.
शेतकरी कडुन नाहकतच घोषणा पत्र च्या नावाखाली शेतकरी ची दिशाभूल करणे सुरु आहे. तहसीलदार तिरोडा प्रंशात घोरूडे यांच्या शी उपसभापती हुपराज जमईवार यांनी स्वघोषनापत्र बदल माहिती विचारले असता आम्ही असे निर्देश कोणत्याही तलाठी व कर्मचारी ला दिले नसल्याचे सांगितले. व तसे शासनाचे परीपत्रक नाही असल्याचे सांगितले. आपल्या स्वयमर्जीने जे तलाठी, कर्मचारी करतील त्याचावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपसभापती हुपराज जमईवार यांनी केली आहे.