संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 28:-कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हातात पीक येण्याच्या तोंडावर पावसामुळे बळीराजा हा आर्थिक विवंचनेत अडकला असून आनंदाचा व उत्साहाचा मानला जाणारा दिवाळी पर्व च्या आनंदावर कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांवर विरजण पडले .
कामठी तालुक्यातील शेतकरीवर्ग, शेतमजूर, कामगार, मजुरवर्ग यांच्यामध्ये दिवाळीच्या पर्वावर जो आनंद असायला पाहिजे ते कुणाच्याही चेहऱ्यावर फुलताना दिसत नाही सर्वत्र निराशाजनक वातावरण असून दिवाळीच्या या महत्वाच्या सणावर निसर्गाची अवकृपा व शासनाची नाकर्ते भूमिका असल्यामुळे सर्वत्र विरजण आल्यासारखी परिस्थिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यात निर्माण झाली आहे.
वास्तविकता ऐन पिके हाती येण्याच्या तोंडावर पावसाच्या भडिमाराणे मुख्य पिकांचे चांगलेच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांत आर्थिक कोंडी पसरली त्यात शेतकऱ्यांचा सोयाबीनचा मोठा फेरा असलेला पीकाचे पूर्णतः नुकसान झाले., सोयाबीन पीक हातातून गेले असताना तूर, हरभरा, परहाटी, गहू या पिकावर उत्पन्नाचा कुठलाही भरवसा राहला नाही.धानाचे नुकसान झाले नाही त्यातही नुकसानभरपाईच्या नावावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदत निधी न पोहोचल्याने शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात गेली.
वास्तविकता सोयाबिन पीक हा दिवाळी सण साजरा करण्याकरता आशेचा किरण असतो मात्र ऐनवेळी पाऊस अधिकच पडत असल्याने ग्रामीण भागातील सोयाबीन व धान पीकाचे नुकसान झाले आहे. .तसेच काही भागात फारच कमी प्रमाणात उत्पादन मिळाले अश्या स्थितीत शेतकऱ्यांनि दिवाळी तरी कशी साजरी करावी?असा प्रश्न पडला होता.इतकेच नव्हे तर काही शेतकऱ्यांनि रब्बी पिकासाठी तसेच उदरनिर्वाहा साठी घरातील सोने गहाण ठेवण्याचा सपाटा सुरू केला आहे.