नागपूर :-२९ नोव्हेंबर रोजी शेतकरी बाजार पन्नासे ले आऊट येथे सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कृषी विभागाचे स्मार्ट प्रकल्पाचे प्रमुख उपरीकर उपस्थित होते. एन आय डब्लु सी वाय डी, चे विजय चिचखेडे कोषाध्यक्ष, नाना दवंडे कार्यवाह अष्टविनायक गणेश मंडळ पन्नासे ले आऊट वैभव काळे भवानी मंडळ सेक्रेटरी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.ज्योती सावित्री फुले फार्मर प्रोडूसर कंपनी भंडारा याचे प्रमुख लांजेवार तसेच सहारा फार्मर प्रोड्युसर कंपनी वाडी यांचे प्रमुख रोशन मातुरकर यांच्या पुढाकाराने वरील मार्केट सुरू झाले. मार्गदर्शक संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन चाइल्ड अँड युथ डेव्हलपमेंट ही संस्था शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शनाचे काम करते. रोहिणी भालेराव यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार मानले.