प्रशिक्षण कार्यक्रमातच शेतकऱ्यांना मिळाले आयात निर्यात प्रमाणपत्र

– प्रमाणपत्र वितरणाचे राज्याचे पहिलेच उदाहरण

– वर्धेत शेतकऱ्यांसाठी निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण

– सहभागी सर्व 32 शेतकऱ्यांना मिळणार प्रमाणपत्र

नागपूर :- वर्धा सेवाग्राम आश्रम येथे पाच दिवसीय कृषीमाल निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ व सहकार विकास महामंडळाच्यावतीने आयोजित या प्रशिक्षणातच सहभागी शेतकऱ्यांना आयात निर्यात प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षणातच शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरणाचे राज्यातील हे पहिलेच प्रशिक्षण ठरले आहे.

वर्धा जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम आश्रमातील यात्री निवास येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून आयोजित या नाविन्यपूर्ण प्रशिक्षणात वर्धासह विदर्भातील विविध जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

प्रशिक्षणात सहकार विकास महामंडळाच्या तज्ञ मार्गदर्शकांसह निर्यातदारांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना आयात निर्यात परवाने देण्यात आले. प्रशिक्षणात असे परवाने देणारे वर्धा येथील हे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण ठरले आहे. निर्यातदारांना त्यांचा माल परदेशात पाठवायचा असतो, तेव्हा कस्टम बंदरावर निर्यात परवाना दाखवणे बंधनकारक असते. जेव्हा निर्यादारांना त्यांच्या खात्यात परकीय चलन मिळते तेव्हा बँकेकडून निर्यात परवाना मागितला जातो.

परवाने वितरण कौतुकास्पद -राहुल कर्डिले

प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना प्रशिक्षणामध्येच आयात निर्यात परवाने वितरण करण्याची ही कौतुकास्पद बाब असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. सहकार विकास महामंडळाच्या सहयोगाने हे शक्य झाले. वर्धा जिल्ह्यातून निर्यात वाढविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. काही दिवसातच जिल्ह्यातून चांगली निर्यात होत असल्याचे पाहावयास मिळेल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

वर्धेतील केळी, हळद, डाळीला निर्यात संधी

आळंदी पुणे येथील निर्यातदार जयसिंग थोरवे यांनी वर्धा जिल्ह्यातील केळी, वायगाव हळदीसह विविध प्रकारच्या डाळी निर्यातीस उत्तम आहे. या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यांना योग्य मोबदला देऊन निर्यात योग्य माल खरेदी केला जाईल असे सांगितले. भविष्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्यातदार घडवण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

पाच दिवस चाललेल्या या निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षणात विदर्भातील वर्धा जिल्ह्यासह अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदीया या जिल्ह्यातील जवळपास 32 शेतकरी सहभागी झाले होते. प्रातिनिधिक स्वरुपात 3 शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. उर्वरीत सहभागी सर्व शेतकऱ्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ईद मिलादुन्नबी पर मालवाहक माथाडी संगठन ने बांटा महाप्रसाद 

Sun Oct 1 , 2023
नागपुर :-प्रतिवर्ष अनुसार इस वर्ष भी मालवाहक माथाडी संगठन एवं नागपुर शहर मित्र परिवार के संयुक्त तत्वावधान में जश्ने ईद मिलादुन्नबी के अवसर पर निकाले गए जुलूस का स्वागत किया गया व सभी लोगों को महाप्रसाद बंटा गया. इस मौके पर प्रमुख अतिथि स्वरूप विधायक कृष्णा खोपडे, पूर्व स्थायी समिति अध्यक्ष व पूर्व पार्षद मनोज चापले. पूर्व पार्षद बंडू राउत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com