नागपूर : सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक तत्काळ संबंधित साझ्याच्या तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप पारदर्शकरित्या आणि जलद व्हावे. यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन प्रणाली महा-आयटी कंपनीमार्फत विकसीत करण्यात येत आहे.
सर्व तहसीलदार व निवासी उपजिल्हाधिकारी यांना लॉगईन आयडी देण्यात येणार असून तहसीलदार यांनी प्रणालीमध्ये शेतीपिकांच्या व शेतीजमीनीच्या नूकसानीपोटी द्यावयाच्या मदतीबाबत लाभार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. माहितीमध्ये बाधीत शेतकऱ्यांकडून त्यांचा आधार क्रमाक व बँक खात्याच्या खाते क्रमांकाची आवश्यकता आहे