संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या आजनी गावातील एका शेतकऱ्याने घर मडळी झोपेत असल्याचे संधी साधून आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल पहाटे पाच वाजता घडली असून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव चंद्रभान चिंतामण इंगोले वय 34 वर्षे रा आजनी तालुका कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच नविन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनगृहात हलवून मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.मात्र सदर मृतक तरुण शेतकरी एका व्याधी ने त्रस्त असल्याचे बोलले जाते तर सदर मृतक अल्पभूधारक तरुण शेतकरी हा घरचा कर्ता व्यक्ती होता. याच्या कुटुंबात पत्नी व दोन मुली आहेत .मात्र या आत्महत्येने घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने सदर मृतकाच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.