कन्हान : – वराडा येथे रात्री अवकाळी वादळ वारा, विजेच्या कडकडयाक्या त पाऊस येऊन शेतातील झोपडयावर विज पडुन आग लागुन कुटार व शेती उपयोगी साहीत्य जळुन राखरांगोळी होऊन झोपडयात बांधलेल्या गायीच्या ३ वासरा पैकी १ जळुन मुत्यु, १ जख्मी तर १ सुखरूप बचावले. असे एक लाख रूपयाच्या जवळपास शेतकरी आशिष भालेराव यांचे अवकाळी पाऊ सामुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
शनिवार (दि.१९) फेब्रुवारी २०२२ ला वराडा येथील शेतकरी आशिष चंद्रमोहन भालेराव वय २६ वर्ष यांच्या कडे वडलोपार्जित ८ एकर शेती आहे. शेत धु-यावर शेतीचे साहीत्य व जनावरे करिता झोपडे २ बैल, २ गायी व तीन वासरू असुन सायंकाळी अचानक हवामान बदल्याने २ बैल व २ गायी बाहेर आणि ३ गायीचे वासरू झोपडयात बांधुन घरी आले. दुस-या दिवसी रविवा री सकाळी शेतात गेले असता झोपडयाला आग लागलेली दिसल्याने आजु बाजुच्या शेतक-याला बोलावुन आत पाहीले असता खुटयाला बांधलेले एक काळया, पांढ-या रंगाचे एच एफ जातीचे गायीचे एक वासरू जळुन मुत्यु पावले. कसेतरी सुटुन दुसरे जख्मी आणि तिसरे सुखरूप बचावले. झोपडया त ठेवलेले २ टँक्टर कुटार, नागर, वखर, तिफन, ज्यु, बेडडया संपुर्ण शेती उप योगी साहित्य जळुन राखरांगोळी झाली. ही आग रात्री ला झालेल्या पाऊसा त विज पडुन झोपडयाला आग लागली असावी असा कयास व्यकत करित शेतक-याचे २ वर्षाचे गायीचे वासरू किंमत ३५ हजार रू. कुटार किंमत ११ हजार व इतर शेती उयोगी साहित्य असे जवळपास एक लाख रूपयाच्या मुद्देमालाचे नुकसान झाल्याने युवा शेतकरी आशिष भालेराव चिंतातुर झाला आहे. घटनास्थळी वराडा सरपंचा, ग्रा प सदस्य, पटवारी, पोलीसानी भेट देत घटना स्थळाचा पंचनामा करून आग लागल्याची नोंद करून वरिष्ठाना अहवाल पाठविण्यात आला आहे.
पिडीत शेतक-यास शासना व्दारे आर्थिक साहाय्यता देण्यात यावी- सौ विद्याताई चिखले.
अवकाळी वादळ, वारा, विजेच्या गर्जेने सह पाऊस आल्याने वराडा येथील शेतातील झोपडयावर विज पडुन आग लागल्याने एका दोन वर्षाचे गायीचे वासरू मुत्यु पावले तर एक जख्मी झाले आणि शेती उपयोगी साहित्य आगीत जळुन राखरांगोळी होऊन शेतक-यांचे अतोनात एक लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याने शासना व्दारे चिंतातुर शेतक-यास आर्थिक साहय्यता करण्याची मागणी गावकरी व शेतक-यांच्या वतीने वराडा सरपंचा विद्याताई दिलीप चिखले हयानी केली आहे.