नागपूर :- मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तीनही राज्यांतील हा निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या वाटचालीला गती देण्यासाठी जनतेने दाखविलेला विश्वास आहे. देशाने विविध क्षेत्रात आज जगाच्या पटलावर ठळकपणे आपली छाप उमटविली आहे. महिलांपासून ते युवकांपर्यंत, दिव्यांग, क्रीडापटू या सर्वांसाठीच कल्याणकारी विकासाच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात राबविल्या जात आहेत. देशाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या सर्वंकष विकास कार्याला जनतेने आपली पसंती दर्शवून भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखविलेला आहे. देशातील केवळ तीनच राज्य नव्हेत तर संपूर्ण १४१ कोटी जनता आज मोदींच्या पाठीशी असल्याचे हे शुभ संकेत आहेत.
दूरदर्शी विकासाच्या दृष्टीकोनावर दाखविलेला विश्वास – संदीप जोशी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com