संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नवनियुक्त पदाधिका-यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा सत्कार.
कन्हान : – कन्हान शहर विकास मंच ची नवीन कार्य कारणी घोषित करून नवनियुक्त पदाधिका-यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रमास उपस्थित मान्यव रांच्या हस्ते नोटबुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला.
रविवार (दि.१५) मे ला शहर विकास मंच च्या नवनियुक्त पदाधिका-यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक कन्हान येथे करण्यात आले. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभा कर रूंघे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महा त्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कन्हान शहर विकास मंच गेल्या चार वर्षापासुन सातत्याने शहरातील विविध विषय, समस्या प्रशासना समोर ठेऊन सोडविण्याचे कार्य करीत असुन सामाजिक कार्यक्रम सुद्धा करीत आहे. या अनुषंगाने मंच मध्ये काही पद फेरबदल करून पुढे मंच मजबुत व क्रियाशील करण्याकरिता मंच अध्यक्ष ॠषभ बावन कर च्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन विचारविमर्स करून सर्वांनुमते मंच उपाध्यक्ष म्हणुन महेंद्र साबरे, सचिव- सुरज वरखडे, सहसचिव- प्रकाश कुर्वे, कोषा ध्यक्ष- महेश शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर भरत सावळे, प्रभाकर रूघे हयांची मंच मार्गदर्शक म्हणुन निवड करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. शहर विकास मंच चे सातत्याने सुरू असलेले कार्य पाहता युवकांनी मंच मध्ये प्रवेश केल्या ने हरीओम प्रकाश नारायण, अनुराग महल्ले, कृणाल राजपुत, वैभव थोरात, प्रविण हुड, हिमांशु डाफ, तेजस उमाळे सह प्रवेश घेणाऱ्या सर्व सदस्यांचा मंच संस्थाप क अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते नोटबुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यकत केले.