इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

नागपूर : इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च 2023 च्या परीक्षेस खाजगीरीत्या प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतात. सदर अर्ज विलंब व अति विलंब शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 1 सप्टेबर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. सदर अर्ज करण्यास 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क 20 रुपये प्रती विद्यार्थी प्रतीदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज विलंब व अतिविलंब शुल्कासह 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करता येणार आहे.

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी व 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. त्यामुळे कुणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी. इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर तर इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास व्दितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड , पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करतील.

कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर किंवा मोबाईलव्दारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी.

विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेचच दुस-या दिवशी जमा करण्यात यावी. इयत्ता 10 वी च्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्क 1000 रूपये नोंदणी शुल्क व 100 रुपये प्रक्रिया शुल्कासह विलंब आणि अतिविलंब शुल्क लागेल. तसेच इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये नोंदणी शुल्क व 100 रुपये प्रक्रिया शुल्कासह विलंब आणि अतिविलंब शुल्क लागणार आहे.

इयत्ता 10 वीसाठी खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्याच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषया संदर्भातील कामकाज करावयाचे आहे.

इयत्ता 12 वीसाठी खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्याचा पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी श्रेणी परीक्षा दयावयाच्या आहेत.

इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी फेबु-मार्च 2023 परीक्षेकरिता खाजगी विदयार्थी फॉर्म नं. 17 नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य राहिल. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल. याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी. आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांचेकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.

ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020- 25705207, 25705208 व इतर बाबींसाठी 25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र अथवा कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. खाजगी विद्यार्थी नावनोंदणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची ही अंतिम मुदत आहे.

यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य व संबंधित घटकांनी नोंद घेवून उपरोक्त कालावधीतच फॉर्म भरणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी, असे राज्यमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सायबर क्राईम चे विषय व यावर जनजागृती जी.ई एस. हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय नवेझरी येथे  

Tue Nov 22 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील जी.ई. एस.हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सायबर क्राईम बदल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी के.वाय.सी फ्रॉड , स्क्रीन शेअर फ्राड, ओएलएक्स फ्राड , केबीसी फ्राड ,लोन , गुगल कस्टमर केअर फ्राड ,फेसबुक प्रोफाईल फ्राड, ॲमेझॉन फ्राड ,व्हाट्सअप व्हिडिओ सेक्सटॉर्षण, कस्टम गिफ्ट फ्राड ,मॅट्रिमोनीयल फ्राड पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या जनजागृती संदेश इत्यादींवर विस्तृत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!