आधारभूत किंमत धान खरेदी खरीप हंगाम 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ

भंडारा :- शेतकऱ्यांना आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही. आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर 7/12 उतारा, आधार कार्ड, बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत या कागदपत्रासह मुदतीआधी जाऊन नावाची नोंद करावी, असे आवाहन पणन विभागाने केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रोत्साहनपर लाभ मिळविण्याकरिता आधार कार्ड बँक खात्यास लिंक करा - जिल्हा उपनिबंधक

Tue Dec 13 , 2022
भंडारा :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना अंतर्गत सन 2017-18 ते 2019-2020 या तीन आर्थीक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थीक वर्षात पिक कर्जाची उचल करून विहीत मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सदर कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पिक कर्जाच्या मुद्दल रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com