जुलै-2022 सत्राकरिता इग्नो अभ्यासक्रमांसाठी प्रवेशास दि.7 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

अमरावती :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत जुलै, 2022 सत्राकरिता पदव्युत्तर पदवी (एम.ए. इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, ग्रामीण विकास, इंग्रजी, फिलॉसॉफी, हिंदी), एम. कॉम, स्नातक पदवी (बी.ए., बी.कॉम., बी.टी.एस, बी.कॉम ए.एफ., बी.ए.ऑनर्स), पदविका (डिप्लोमा), इत्यादी अभ्यासक्रमांकरिता इग्नोच्या www.ignou.ac.in वेबसाईटवरून दिनांक 7 नोव्हेंबर, 2022 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश शुल्क इंटरनेट बँकींग/डेबीट/क्रेडीट/एटीएम कार्डद्वारे भरावयाचे असून सविस्तर माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबाबतची माहिती इग्नोचे उपरोक्त वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरिता इच्छुकांनी इग्नोचे अभ्यासकेंद्र, मुलींचे वसतीगृहाजवळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसर येथे सकाळी 8.30 ते 10.30 या वेळात संपर्क साधावा असे डॉ.वर्षा नाठार, समन्वयक, इग्नो अभ्यासकेंद्र, अमरावती यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महानगरपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तथा कुटुंब निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

Tue Nov 1 , 2022
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी तथा कुटुंब निवृत्तीधारकांनी हयातीचा दाखला भारतीय स्टेट बँक, मुख्य शाखा,चंद्रपूर येथून प्रमाणित करून महानगरपालिकेतील लेखा विभागात तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व कुटुंब निवृत्तीधारकांनी त्यांच्या हयातीचा दाखला बँक ऑफ इंडिया, चंद्रपूर येथून प्रमाणित करून महानगरपालिकेतील शिक्षण विभागात दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करावेत. तसेच सन 2022-23 या वित्तीय वर्षाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com