मुक्त विद्यालयातील पाचवी व आठवीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

नागपूर :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी व 8 वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी-2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पध्दतीने प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्विकारण्यात येणार असून संकेतस्थळावर अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व आवश्यक कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये 18 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत जमा करावे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय तटरक्षक दलाचे प्रदूषण-नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रहरी’ ने बँकॉकमधील क्लोंग टोई बंदरावर थायलंडच्या अधिका-यांसह केला प्रदूषण प्रतिसाद टेबल-टॉप सराव

Thu Sep 21 , 2023
– पुनीत सागर अभियाना अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, दूतावासाच्या अधिका-यांसह जहाजावरच्या कर्मचा-यांनी पट्टाया सागरी किनाऱ्यावर राबविला स्वच्छता उपक्रम नवी दिल्ली :-भारताचे सागरी कौशल्य आणि वचनबद्धता अधिक प्रभावी करण्याच्या हेतूने सामायिक आव्हाने, विशेषत: सागरी प्रदूषणाला तोंड देण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) प्रदूषण-नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रहरी’ ने 20 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या चार दिवसांच्या भेटीच्या अंतिम दिवशी थायलंडमधील बँकॉक इथल्या क्लोंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!