कोदामेंढी :- शासनाने एक रुपयात ई- पिक विमा काढण्याची मुदत आज 15 डिसेंबर रविवार पर्यंत ठेवली असून, कधी नेट बंद ,तर कधी साईट बंद, तर कधी दोनही स्लो, कधी सर्वर डाऊन त्यातच ही पिक विमा काढणाऱ्या केंद्रांवर गर्दी होत असल्याने व धानपट्टा म्हणून ओळखलं जाणाऱ्या मौदा तालुक्यातील मागील पाच दिवसांपूर्वी पासून वातावरण ढगाळ रहात असल्याने व कुठे कुठे पावसाच्या हलक्या सरी येत असल्याने धान कापणी ,मळणी व विकणे या कामांना शेतकरी युद्ध स्तरावर प्राधान्य देत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी गर्दीला कंटाळून ई पीक विमा अजून पर्यंत काढलेला नाही, ई पीक विमा काढणाऱ्या केंद्रातील ऑपरेटरांना आज ए पीक विमा काढण्याच्या शेवटच्या दिवशी 15 डिसेंबर रविवारला रात्री नऊ वाजता दरम्यान भ्रमणध्वनीवरून विचारपूस केली असता त्यांनीही अनेक शेतकरी अजूनही पिक विमा पासून वंचित असल्याचे सांगितले व अजूनही त्यांचे ई पीक विमा काढण्यासाठी फोन येत असल्याचे कोदामेंढी येथील ऑपरेटर राहुल बोंबले सह तालुक्यातील इतर ऑपरेटरनी सांगितले. त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटाच्या सामना करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाई पासून ई पीक विमा अभावी वंचित राहू नये यासाठी शासनाने ई पीक विमा काढण्याची मुदत आणखी पंधरा दिवस वाढवून 30 डिसेंबर पर्यंत करावी अशी मागणी गट ग्रामपंचायत खंडाळा(पिपरी) अंतर्गत येणाऱ्या पिपरी येथील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी व मौदा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रभान किरपान यांनी केली आहे.