नागपूर :- मागील सहा ६ वर्षा पूर्वीपासून महानिर्मिती कोराडीतील, कोळसा हातळणी विभागातील वाहन दुरुस्ती विभागा अंतर्गत सन 2016 पासुन 13 इंडीगो वाहनाची तर 7 बोलेरो वाहनाची निविदा काढण्यात आली असुन सदर निविदा मध्ये असलेल्या तरतुदी प्रमाणे तसेच शासनानी व प्रशासनाने ठरविल्या प्रमाणे अधिनियमान्वये सदर वाहन चालकांना मासीक वेतन, भत्ते व इत्तर सुविधा देण्याकरीता सदर वाहन दुरुस्ती विभागाचे विभाग प्रमुख बंदिस्त असुन सुद्धा सदर विभाग प्रमुखाने आपले स्वताचे खीसे भरण्याकरीता मागील सहा वर्षा पासुन सदर वाहन चालकांना 26 दिवसाचा मासीक कीमान वेतन म्हणुन फक्त 8500 रु इतके देण्यात येते.
तीन शिफ्ट डयुटी 15 वाहन चालक शिप्ट मध्ये तर 2 जनरल मध्ये अशी सदर निविदा मध्ये तरतुद असुन सुद्धा फक्त 7 वाहन चालकांमध्ये 24 , 24 तास कसे काय वाहन चालवुन घेउन अतीरीक्त तासाचे वेतन सुध्दा देण्यात येत नसुन, सदर वाहन चालकांचे सदर विभाग प्रमुख शोषण व पीळवणुक करत आहे. वारंवार कोराडी प्रशासन यांना तोंडी व लेखी निवेदन देवुन ही, स्थानिक प्रशासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही कामगार हीतसंबधी अद्यापप्रयंत करण्यात आलेली नाही.
आमच्या असे निर्देशनास येत आहे की कोराडी प्रशासन गाड झोपेत आहे. किंवा झोपेचं ढोंग करत आहे. झोपेचं ढोंग करीत नसतील तर, संपूर्ण स्थानिक कोराडी प्रशासन मरण पावले की काय ? पत्रकार बंधुना नम्र विनंती करित आहे ही इंकवायरी कमीशन बसवुन आढडेल बट्टया दोषी अधीकारी यांचा खीस्यातुन /वेतनातुन रक्कम कपात करुन मागील सहा वर्षा पासुन शोषण केलेल्या 19 कामगांराचा बैंक खात्यात टाकण्याचे नियोजन करावे व अश्या भ्रष्ट अधीकारी यांना (निलंबित) योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन सदर वाहन चालकांना अश्या भ्रष्ट अधीकारी च्या तावडीतुन मुक्त करुन नियमीत रोजगार देण्याचे करावे व माहे जानेवारी, मार्च, एप्रील ह्या तीन महिन्याचा वेतन थकबाकी असुन सदर कामगारांनी वेतन मागीतल्यास सदर विभाग प्रमुखांनी आकसापोटी सुडबुध्दीने खोटे नाटे आरोप लावुन घरी बसविण्यात आलेल्या कामगारांना नामे-राहुल बागडे, विक्की बोरकर, नितीन मेश्राम, आशिष लांजेवार, रवी मडावी या कामगारांना ताबडतोब नियमीत कामावर रुजु करावे व थांबवून ठेवण्यात आलेले वेतन कामगाराला देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी महाराष्ट्र विज कामगार संघ व संलग्न भारतीय मजदूर संघ कोराडी शाखेच्या वतीने कार्याध्यक्ष पवन कोठारे व संघटन महामंत्री विक्की बोरकर यांनी महाराष्ट्र शासन, व कोराडी प्रशासनाला केलेली आहे.
असे पवन कोठारे, नितीन मेश्राम, विकी बोरकर, राहुल बागडे, आशिष लांजेवार, रवी मडवी, अतुल बोराडे, दीपक सागर, बाबूलाल चौरसिया, अविनाश कुकरे, शैलेश बनाईत, मनोज मौजे, सुभाष बागडे, कमलेश काकडे, अतुल महालगावे, महेश कावडे, रुपेश भवते या सर्वांनी पत्रपरिषद मध्ये उपस्थित राहून न्यायाची मागणी केली आहे. पवन कोठारे कार्याध्यक्ष -महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ – संलग्न भारतीय मजदूर संघ शाखा कोराडी यांनी पत्रकारांना माहिती दिली.