नागपूर :- शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत नागपूर महानगरपालिकेतर्फे मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात हॉटमिक्स प्लाँट विभागातर्फे सर्व झोनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना झोननिहाय खड्डे बुजविण्याचे निर्देश दिलेले आहे.हॉटमिक्स प्लाँटतर्फे १ एप्रिल पासून ७ सप्टेंबर २०२३ पर्यंत ३२५९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. यामध्ये जेट पॅचर मशीनने ९२८ खड्डे आणि हॉटमिक्स प्लाँट कडून २३२८ खड्डे बुजविण्याचे कार्य करण्यात आले आहे. तसेच ६८७४ चौरस मीटर खड्डे जेट पॅचेरच्या सहाय्याने आणि ३१६८४ चौरस मीटर खड्डे हॉटमिक्स प्लाँटच्या मशीनद्वारे बुजविण्यात आले आहेत, अशी माहिती हॉटमिक्स प्लाँट विभागाचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी दिली.
झोननिहाय गोषवारा
(१ एप्रिल ते ७ सप्टेंबर २०२३)
झोनचे नाव दुरुस्ती केलेले खड्यांची संख्या
लक्ष्मीनगर – ५०४
धरमपेठ – १७५
हनुमाननगर – २८७
धंतोली – २४५
नेहरूनगर – ४३७
गांधीबाग – २१४
सतरंजीपूरा – २२८
लकडगंज – ३७३
आशीनगर – ३५६
मंगळवारी – ४३७
एकूण – ३२५९