संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– विजयी खेडाळुचे जल्लोषात स्वागत व अभिनंदन.
– राज्यस्तरीय खुली सैम्बो कुस्ती स्पर्धेत बीकेसी पी खेडाळुनी १२ स्वर्ण,३ रजत व१ कास्य असे १६ पदक
कन्हान :- राज्यस्तरीय ओपन सैम्बो कुस्ती स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हान च्या १६ विद्यार्थी खेडाळुन स्वर्ण, रजत व कास्य पदक प्राप्त करून कन्हान शहरा त पदार्पण करताच पालकवर्गानी वाज्या गाज्या, फटा क्याची आतिषबाजी करून खेळाडुंचे व क्रिडा शिक्षक चे पुष्पगुच्छ, पुष्पहार आणि गोड तोंड करून अभिनंद न करूत जल्लोहषात स्वागत करण्यात आले.
पुणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ओपन सैम्बो चैम्पियनशिप मध्ये नागपुर जिल्हयाला २३ स्वर्ण पदक ११ रोप्य पदक आणि ३ कांस्यपदक पटकाविले असुन बीकेसीपी स्कुल कन्हानच्या विद्यार्थी खेडाळुनी स्पर्धेत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. खेळाडुंच्या या उत्कृष्ट प्रदर्शना मुळेच नागपुर जिल्हा हा स्पर्धेत चॅम्पियन ठरला. शाळेचे एनआयएस, एएफआय प्रशिक्षक श्री अमितसिंह ठाकुर सरांच्या मार्गदर्शनात शाळेतील खेळाडु प्रशिक्ष ण घेत आहे. सैम्बो चैम्पियनशिप मध्ये १२ स्वर्ण, ०४ रजत व ०१ कास्य पदक असे १६ पदक पटकावित आपले व शाळेचे नाव गौरन्वित केल्याने शाळेचे संचालक राजिव खंडेलवाल, गेरोला , संस्था सदस्य अशोक भाटिया, मुख्याध्यापिका कविता नाथ, मुख्याध्यापिका (प्राथ.) रूमाना तुरक, पालक शिक्षक संघ अध्यक्ष मोतीराम रहाटे, जेष्ट शिक्षक विनयकुमार वैद्य, रेणु राऊत, सविता वानखेडे सह शिक्षक, शिक्षिका व पालकवर्ग रविंद्र कोतपल्लीवार, अजय ठाकरे, अनिल मंगर, कैलास खंडार, सुभाष मदनकर, शारिक अन्सारी, अमित ओमरे, नितिन ओमरे, निक्की सिरिया, योगेश्वर खरवार, लोणेश्वर देशमुख, राजेंद्र मानकर, नसीमुनिशा, कुंदा मंगर, वैशाली खंडार सह महिला व नागरिकांनी विजयी खेडाळु व क्रिडा शिक्षक अमितसिंह ठाकुर यांचे अभिनंदन करून जल्लोषात स्वागत केले. शहरातातुन विजयी खेडाळुंवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.