मुंबई :- विकसित भारत संकल्प यात्रा 03.12.2023 ला वसई विरारमधील नवजीवन नाका, वसई पूर्व येथे दाखल झाली. उपायुक्त विशाखा मोटघरे, प्रभाग ‘एफ’ च्या सहाय्यक महानगरपालिका आयुक्त मनाली शिंदे आणि वालिव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी उपमहापौर आणि पालिका आयुक्तांनी मराठीतून विकसित भारत संकल्पाची शपथ घेतली.
आयुष्मान भारत 140, आधार अद्ययावत 156, आरोग्य शिबीर 190, उज्ज्वला भारत 60 आणि पंतप्रधान स्वनिधी योजना 190 अशा विविध शिबिरांचा 736 लोकांना लाभ झाला. विकसित भारत संकल्प यात्रा वसई विरार शहर महानगरपालिका परिसरात 28 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत फिरणार असून शहरातील एकूण 49 ठिकाणांना ती भेट देईल. या ठिकाणी या निमित्ताने आरोग्य शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.
विकसित भारत संकल्प यात्रा सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात मार्गक्रमण करत असून मुंबई आणि जवळच्या परिसरामध्ये या संकल्प यात्रेच्या गाड्या विविध सरकारी योजना नागरिकांच्या दारी आणण्याचे काम करीत आहेत.
ठाणे पूर्व भागात गॅस आणि तत्सम सुविधांचा लाभ घेताना नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने दहिसर पूर्व भागामध्ये पीएम स्वनिधी योजनेची माहिती आणि मदत उपलब्ध करून देण्यात आली.
ठाण्याच्या कोपरी भागात विकसित संकल्प भारत यात्रेदरम्यान आधार मधील बदलासाठी लावलेल्या स्टॉल वर बरीच वर्दळ दिसून आली.