‘एक बाळ -एक झाड ‘ही संकल्पना सर्वांनी जोपासावी-वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 15 :- ढासळत असलेल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निर्माण झाली आहे हरित महाराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेतुन ‘एक बाळ -एक झाड’ ही संकल्पना सर्वांनी जोपासावी व वृक्ष संवर्धनाचा निर्धार करावा असे आवाहन नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी आज 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले. .

याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे,एपीआय भातुकले,एपीआय नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक मोतींगे आदी उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आंनदनगर येथे ध्वजारोहण

Mon Aug 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र १५ ऑगस्ट – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कामठी प्रभाग 15 आंनद नगर येथे स्लम सॉकर च्या फुटबॉलपटू मुनमुन यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्ज्वल रायबोले यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी पांडुरंग रामटेके,जया मेश्राम,विद्या बोंबले,विशाखा फुलझेले,हर्षाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com