कामगार कवी लिलाधर दवंडे यांना विश्वकर्मा कामगार भूषण पुरस्कार प्रदान

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 20:-मंगळवार दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी मुंबई येथील कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनु सण २०१९ चा विश्वकर्मा कामगार भूषण पुरस्कार महाराष्ट्रातील ५१ उत्कृष्ट कामगारांना कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री श्री बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते देण्यात आले.
भव्य दिव्य अशा आयोजनात सनईच्या सुरात आणि गार्ड परेडच्या सर्व कामगारांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि २५ हजार रुपयांचा चेक देण्यात आला.
या प्रसंगी कामगार आयुक्त सुरेश जाधव, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, विकास आयुक्त असंघटित कामगार डॉ अश्विनी जोशी, कल्याण आयुक्त श्री रविराज इळवे यांच्या सह कामगारांच्या नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सौ साठे ताईंनी केले. नागपूर विभागातून लिलाधर दवंडे ( इंडोरामा सिंथेटिक इं लिमी, बुटीबोरी ), कोमल ठाकरे ( ग्रँडव्हील, बुटीबोरी) या कामगारांचा समावेश होता. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागरिकांचे गहाळ झालेले 10 मोबाईल जरीपटका पोलिसांकडून परत

Wed Apr 20 , 2022
संदीप कांबळे, कामठी नागपुर  20 :-  नागरिकांचे गहाळ झालेले 10 महागडे मोबाईल जरीपटका नागपूर पोलिसांनी परत केले आहेत. पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी 10 मोबाईल परिमंडळ क्र 5 चे पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस अंमलदार उपेंद्र आकोटकर व सुनील यादव यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले. नागपूर परिमंडळ क्र 5 अंतर्गत महागडे मोबाईल हरवणे व गहाळ होण्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com