प्रत्येक काम ‘ओनरशीप’ घेऊन करतो – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी दिलखुलास गप्पा

नागपूर :- देशभरात अनेक महामार्ग, टनेल्सची कामे होत आहेत. मी एकदा एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण करतोच. होणार नसेल तर तसे आधीच सांगतो. पण देशासाठी प्रत्येक काम ‘ओनरशीप’ घेऊन करतो. प्रत्येकाने हीच वृत्ती बाळगली तर सगळी कामे व्यवस्थित पूर्ण होतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.

सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी ना. नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रशांत दामले यांचे खुमासदार प्रश्न आणि त्याला ना. गडकरी यांची दिलखुलास उत्तरे अशी जवळपास सव्वा तास ही मुलाखत रंगली. एवढी कामे केल्यानंतरही रात्री झोपताना ‘आता कुठला रस्ता राहिला असेल?’ असा प्रश्न मनात येतो का, या प्रश्नावर ना. गडकरी यांनी भूमिकेशी आणि कामाशी प्रामाणिक असल्याचे सांगितले. ‘प्रभाकर पणशीकरांची नाटके मी बघितली आहेत. ते एका नाटकात औरंगजेबाची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारायचे. मी माझ्या भूमिकेशी प्रामाणिक असल्याचे ते कायम सांगायचे. माझेही तेच आहे. मी माझ्या भूमिकेशी आणि कामाशी प्रामाणिक आहे,’ असे ना. गडकरी म्हणाले. यावेळी आवडती गाणी, आवडती नटी, खवय्येगिरी, नाटकांची आवड, आवडते पर्यटनस्थळ आदी विषयांशी संबंधित प्रश्नांवर ना. गडकरी यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली. यावेळी विष्णूदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रशांत दामले यांचा ना. गडकरी यांनी विशेष सत्कार केला. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने ‘मनातले गडकरी’ हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ना. गडकरी यांच्या कारकिर्दीचा व कार्याचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले.

कार्यकर्ताच माझा राजकीय वारसदार

आपला राजकीय वारसदार कोण असेल, या प्रश्नावर ना. नितीन गडकरी यांनी माझ्या पक्षातील कार्यकर्ताच माझा राजकीय वारसदार असणार आहे, असे सांगितले. ‘माझ्या पक्षातील ज्या कार्यकर्त्यांच्या श्रमाच्या जोरावर मी येथवर पोहोचलो. त्यामुळे कार्यकर्त्यांचाच पहिला हक्क आहे,’ असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी 5 लक्ष 11 हजार 500 रुपयांची घरफोडी

Thu Oct 26 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरानगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून 65 हजार रुपये नगदी व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5 लक्ष 11 हजार 500 रूपयाची घरफोडी केल्याची घटना गतरात्री साडे आठ दरम्यान घडली असून यासंदर्भात जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस कर्मचारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!