‘शासन आपल्या दारी’ योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा – आ.कृष्णा खोपडे

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्य आयोजन

नागपूर :- पूर्व नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्य “शासन आपल्या दारी” या शिबिराचा शेवटचा टप्पा दि. 08 ते 11 ऑगष्ट पर्यंत भवानी मंदिर परिसर, पुनापूर पारडी येथे सुरु झालेला आहे. दररोज हजारोच्या संख्येने नागरिक या शिबिरात येऊन विविध शासकीय योजनेचा लाभ घेत आहे. दि. 11 जुलै 2023 पासून सुरुवात झालेल्या या शिबिराचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा, असे आव्हान आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.

सदर शिबिरात जवळपास 20,000 नागरिकांनी लाभ घेतला असून नवीन आधार कार्ड/दुरुस्ती, शिधापत्रिका (नवीन व बदल), बांधकाम कामगार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, एस.टी.पास (जेष्ठ नागरिक/दिव्यांग), नवीन वीज कनेक्शन, नवीन मतदार नोंदणी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत), दिव्यांग प्रमाणपत्र व कार्ड नोंदणी, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, स्वनिधी योजना (पथविक्रेतेसाठी), जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सुकन्या योजना, म्हाडा, संबंधित सर्व बांधकामे आदी योजनांचा समावेश आहे.

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार विकास कुंभारे यांनी सदर शिबिराला भेट दिली असून त्यांचे हस्ते अनेक लाभार्थ्यांना नवीन राशन कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सिटी सर्वे आखीव पत्रिका वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे माध्यमातून नेत्र व कर्ण तपासणी या शिबिरात करण्यात येत आहे.

या योजनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. विविध योजनांचा लाभ एका छताखाली जलद गतीने मिळावा, याकरिता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. करिता जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.

या शिबिरात शहर संपर्क प्रमुख प्रमोद पेंडके, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, भवानी माता सेवा समितीचे अध्यक्ष पांडुरंग मेहर, महामंत्री सेतराम सेलोकर, राजू गोतमारे, जे.पी.शर्मा, संपर्क प्रमुख सुनिल सूर्यवंशी, माजी नगरसेवक दिपक वाडीभस्मे, प्रदिप पोहाणे, देवेंद्र मेहर, वैशाली वैद्य, राजकुमार सेलोकर, मनिषा अतकरे, जयश्री रारोकर, मंदाताई लेंडे, सन्नी राऊत, निशा भोयर, देवेंद्र बिसेन, संजय मानकर, कपिल लेंडे, राजू दिवटे, शैलेश शाहू, प्रेम कुर्रे, धर्मराज हजारे, देवेंद्र वैद्य, रमेश शाहू, रितेश राठे, अरुण हारोडे, अनिल कोडापे, अशोक शिवहरे, मुन्ना पटले, निशा भोयर, सीमा ढोमणे, संगीता गुप्ता, वर्षा चानोरे, मीरा सोनवानी, उर्मिला बोंडे, पूजा निनावे, मनोरमा कनोजे, रेखा राईकवार, चंदा मानवटकर, प्रवीण निशाणकर, आदित्य अवचट, पिंटू टिचकुले, सुबोध मानवटकर, विवेक ठवकर, विजय रहांगडाले, हरिभाऊ वैद्य, विष्णु मल्लेवार, हरीश साहू, प्रमोद कुजलकर, भोला वाट, मनहरण साहू, प्रकाश दातीर लक्षण कनोजे, शुभम पठाडे, चंद्रिका पांडे, गुलजारीलाल यादव, दीपक वांढरे, रजत मल्लेवार, ईशवर सारवा, देवकुमार साहू, पिंटू भिवंगडे, विकास रहांगडाले, आशिष गुरव, निलेश रारोकर, देविदास चौकट, भैयालाल बिसेन, आदित्य अवचट, हर्षल मल्लेवार, मनोज विलायतकर, हिमांशू लांजेवार, नंदलाल बिसेन, भरतलाल साहू, राजकुमार काटेकर, उत्तम पोटे, चक्रधर अतकरे, समीर साखरकर, प्रीति दुबे, निशा भिवगड़े, गिता गंधारे, अर्चना चोरघडे ,मीना साहू, मनोरमा कनोजे, नंदनी विलायतकर, मनीषा धनुषकर, अर्चना पौणिकर, तुषार राऊत, पारेन्द्र बोपचे यांनी विशेष सहयोग दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मणिपूरच्या आगीत तेल कोण ओततोय ? - डॉ. देशमुख

Wed Aug 23 , 2023
नागपूर :- मणिपूरच्या घटनेमुळे देशाची प्रतिमा डागळली जात असून याचा आता राजकीय वापर केला जात आहे. यावर माजी आमदार आणि भाजपा, महाराष्ट्रचे प्रवक्ता डॉ. आशिष र. देशमुख म्हणाले की, “मणिपूर राज्यातील दोन आदिवासी जमातीमधील वाद नवा नाही. अनेक वर्षांपासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत आहे. मात्र आजवर त्यांनी एकमेकांचे कधी मुडदे पाडले नाहीत. महिलांवर हात उगारला नाही. केंद्रात भाजपचे सरकार आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!