संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 6 एप्रिल भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस माजी जी प सदस्य अनिल निधान यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी तालुक्यातील कढोली गावातील बूथ क्र 266 येथे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी सांगितले की लोकसभा निवडणूक ही भाजपा पक्ष संघटनेला आपली ताकद दाखवण्याची सुवर्णसंधी आहे. आत्तापर्यंत विविध अभियान व उपक्रमांद्वारे आपण सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष येथील नागरिकांपर्यंत पोहोचवला. बूथस्तरावर संघटन बांधणीसाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली. आता आपल्या संघटन शक्तीचे विराट रूप दाखवण्याची वेळ आली आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सुपर वॉरियर्सनी व कार्यकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कामठी मौदा विधानसभा अंतर्गत बूथ स्तरापर्यंत प्रचंड मेहनत घेऊया. कामठी मौदा विधानसभा मधील प्रत्येक बूथ महायुतीसाठी मजबूत करूया असा संकल्प करण्यात आला.याप्रसंगी कढोली ग्रा प सरपंच लक्ष्मण करारे,माजी सरपंच प्रांजल वाघ, राजेश वाघ यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.