नागपूर :-आंबेडकरी चळवळ समस्या निवारण करण्याचें माहेर घर आहे या चळवळीची जो पण कास धरेल तो समस्या मुक्त होईल आताही काही बिघडले नाही आता तरी गोवारी समाजाने आंबेडकरी चळवळीची कास धरावी असे प्रतिपादन आंविमो, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते शहिद गोवारी स्मारक येथे शहिद झालेल्या गोवारी बांधवांना मानवंदना देते वेळेस बोलत होते.
कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा.रमेश दुपारे, धर्मा बौद्ध बागडे, राहूल ठाकरे, प्रदिप धुपे, संगिता चंद्रीकापुरे, सुनिता चांदेकर, हे उपस्थित होते. बौद्ध, गोवारी, आदिवासी, ऐकता जिंदाबाद या घोष वाक्य देऊन धर्मा बौद्ध बागडे यांनी परिसर दणाणून सोडले कार्यक्रमात चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.