संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरात सध्यास्थितीत परिस्थितीअभावी दोन नगर परिषद कार्यालय कार्यरत आहेत. कामठी नगर परिषदची जुनी इमारत ही जीर्णावस्थेत आल्याने ही इमारत सुसज्ज व नाविन्यपूर्ण बांधकाम करणे विचाराधीन असल्याने तत्कालीन मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांच्या कार्यकाळातील सन 2015-16 मध्ये शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र बांधकामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. इमारत अतिशय जीर्णावस्थेत आले असून संभाव्य धोका लक्षात घेता या नगर परिषद इमारतीचे संबंधित कार्यालय हे 2019 मध्ये जुनी कामठी पोलीस स्टेशन समोरील स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस स्किल अँड डेव्हलपमेंट सेंटर च्या सुसज्ज नाविण्यापूर्ण इमारतीत स्थानांतरण करण्यात आले. तसेच नगर परिषदच्या जुन्या इमारतीच्या बाजूच्या कार्यालयात काही कार्यालय तर काही कार्यालय नवीन नगर परिषद कार्यालयात कार्यरत आहेत.वास्तविकता नगर परिषद च्या बांधकामासाठी आलेल्या 4 कोटी रुपयांच्या निधीतील 92 लक्ष रुपयांचा निधी नगर परिषद प्रशासनाने गोरक्षण शाळेच्या विस्तारीकरण साठी वळती करण्यात आला तर उर्वरित 3 कोटी 92 लक्ष रुपयाचा शासकीय निधी अजूनही नगर परिषदच्या तिजोरीत आहे. तसेच बांधकाम करण्याहेतु नगर परिषद कार्यलयची जीर्ण इमारत पाडून चार वर्षे लोटली तरीसुद्धा या इमारतीच्या बांधकामाचा मुहूर्त नगर परिषद प्रशासनाला मिळत नाही ?तेव्हा या नगर परिषद इमारतीचे बांधकामाचा शुभारंभ केव्हा करणार?असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
कामठी नगर परिषद हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून शहराच्या विकासाचा मार्गच या कार्यालयातून निघत असतो ज्याचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष भूमिका बजावतात. शहरातील नागरिकांच्या हितार्थ जुनी कामठी पोलीस स्टेशन समोरील जागेत नगर परिषदने स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस स्किल अँड डेव्हलपमेंट सेंटर नावाची इमारत ही शासकीय निधीतून उभारण्यात आली. मात्र ही लोकोपयोगी येण्याआधी व ज्या उद्देशाने या इमारतीचे बांधकाम केले त्या उद्देश्यपूर्तीपूर्वीच इमारतीचा कुठलाही शुभारंभ न करता कामठी नगर परिषद प्रशासनाने ही इमारत परिस्थिती अभावी स्वतःच्या उपयोगात आणत आहेत. आज चार वर्षे लोटून गेले असून कामठी नगर परिषद कार्यालय दोन ठिकाणी कार्यरत असल्याने कित्येक नागरिकांची दिशाभूल होत आहे. नगर परिषद प्रशासनाशी संबंधित कामाने आलेल्या नागरिकाना कधी जुनी नगर परिषद तर कधी नवीन नगर परिषद या नावाने भटकंती करावे लागते. नव्याने बांधकाम होणाऱ्या नगर परिषद इमारतीत वाताणुकील व्यवस्था, नगर परिषद सभागृह, आसन व्यवस्था,मुख्याधिकारी नगराध्यक्ष,उपाध्यक्ष व सभापतीचे स्वतंत्र कार्यालय, संबंधित विभागाचे कार्यालय,पार्किंग व्यवस्था,सुरक्षाभिंतला लागून दुकानाची चाळ अशा विविध नियोजित आराखडा करण्यात आला आहे.त्यानुसार शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 4 कोटी रुपयाचा निधी सुद्धा प्राप्त झाला होता.त्या निधीतून उलट 92 लक्ष रुपयाचा निधी अन्य कामासाठी वळती करण्यात आला.जीर्ण इमारत पाडण्यात आली.मात्र अजूनही या बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली नाही यात कोणते कोडं लपलेले आहे हे समजण्यापलीकडे आहे.