संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27 :- नागपूर महानगरपालिकेत नोकरीवर असलेल्या पतीचा अचानक मृत्यू झाल्याचा धसका घेतल्याने मानसिक वृत्ती बीघडलेली महिला 19 ऑक्टोबर ला भल्या पहाटे जरीपटका नागपूर येथील राहत्या घरून बीघडलेल्या मानसिक अवस्थेत निघून गेली असता सकाळी सात दरम्यान कामठी येथील नेताजी चौकात दिसली त्यानंतर कुठे निघून गेली याबाबत अजूनही शोध लागलेला नाही .यासंदर्भात जुनी कामठी पोलीस स्टेशन ला मिसिंग ची तक्रार नोंदवून आठवडा लोटून गेला तरीही या बेपत्ता महिलेचा कुठेही थांगपत्ता लागेना. बेपत्ता महिलेचे नाव कुंदा मनहरण भीमटे वय 50 वर्षे रा जरीपटका नागपूर असे आहे तेव्हा ही महिला कुणाला आढळल्यास जुनी कामठी पोलीस स्टेशन ला संपर्क साधावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने यांनी केले आहे.