संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्मार्ट सिटी च्या मार्गावर असलेल्या कामठी शहरातील हमालपुरा परिसरात एका 60 वर्षीय रेखा बोरकर नामक मजूर महिलेची दोन अज्ञात चोरट्यानी दुचाकीने येऊन दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना मागिल महिन्यातील 21 एप्रिल ला सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली होती. हे चोरटे माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या घटनेला आज महिना लोटत चालला असला तरी अजूनपावेतो हायटेक असलेल्या जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त आले नसल्याची खंत आहे.
प्राप्त माहितीनुसार नुकतेच 14 मे ला हरदास नगर येथील सोनसाखळी हिसकावल्या प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रफिती च्या आधारे 24 तासाच्या आत चोरट्याचा शोध लावण्यात यशप्राप्त झाल्याने जुनी कामठी पोलिसांनी स्वतःची पाठ कौतुकाने थोपाटली मात्र हमालपुराच्या सोनसाखळी हिसकावल्या प्रकरणात पोलिसांना येत असलेले अपयश हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. हायटेक पोलीस यंत्रणेच्या नावाखाली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या कित्येक वाहतुकदाराना चालान स्वरूपात हजारो रुपयांचा ऑनलाईन दंड ठोठावतात मग या तुलनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांची हायटेक कार्यप्रणाली कुचकामी ठरत आहे.मात्र पोलिसांशी अपेक्षित असलेली सदर पीडित महिला रेखा बोरकर यांनी जुनी कामठी पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याचा लवकरात लवकर शोध लावून सोनसाखळी मिळवुन द्यावी अशी आर्त मागणी करीत आहे.