स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे तिसऱ्या व अंतिम टप्प्याचे मूल्यांकन लवकरच

469 मोहल्ले सहभागी : सहभागी मोहल्ल्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि नागपूर 2025 यांच्यावतीने आयोजित स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे तिसरे व अंतिम टप्प्याचे मुल्यांकन पुढील आठवड्यात सुरू होत आहे. या टप्प्यांमध्ये विजयी झालेल्या मोहल्ल्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. या मोहल्ल्यांमध्ये शहरातील 469 मोहल्ले सहभागी झाले असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेद्वारे देण्यात आली.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लवकच स्वच्छ सर्वेक्षणची टीम नागपुरात येणार आहे. शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, नागरिकांनी त्यात सहभाग घेऊन आपला मोहल्ला स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यामध्ये स्वच्छ मोहल्ला स्पर्धेची सुरूवात झाली असून यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत सहभागी मोहल्ल्यांचे निरिक्षण करणे सुरू आहे. यामध्ये मोहल्ल्यातील कचरा संकलन केंद्र, कचरा वर्गीकरण, रस्त्यांची स्वच्छता, उद्यानांची स्वच्छता, प्लास्टिकबंदी, सार्वजनिक मुत्रीघर, स्वच्छताअॅप डाऊनलोड करणाऱ्याची संख्या, कंपोस्टिंग करणाऱ्या नागरिकांची संख्या या मुख्यबाबींवर मुल्यांकन करण्यात आले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधत त्यांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले आहे.

स्वच्छ मोहल्ला स्पर्धेच्या सहभागी मोहल्ल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोहल्ल्यातील नागरिकांनी स्वच्छतेबद्दल जनजागृती सुरू केली आहे. नागरिकांसमवेत मोहल्ल्यातील स्वच्छता निरिक्षक, जमादार, स्वच्छता कर्मचारी या मोहल्ल्यांमध्ये विशेष लक्ष देऊन कामे करत आहे. मोहल्ल्यांच्या प्रगतीनुसार मोहल्ल्यांना तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. पहिल्या टप्प्यात अ श्रेणीमध्ये 26, ब श्रेणीमध्ये 373 तर क श्रेणी 70 मोहल्ले होते. दुसऱ्या टप्प्यात अ श्रेणीमध्ये 56, ब श्रेणीमध्ये 362, तर क श्रेणीमध्ये 51 मोहल्ले समाविष्ठ आहेत.

मोहल्ला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन मोहल्ल्यांमध्ये प्रत्येकी 25 लाखांचे विकासकामे, दुसऱ्या क्रमांकाच्या पाच मोहल्ल्यांमध्ये प्रत्येकी 10 लाखांची कामे, तिसऱ्या क्रमांकाच्या सात मोहल्ल्यांमध्ये प्रत्येकी 5 लाखांची विकासकामे महानगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहे. आज महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नागपूर 2025 चे शिवकुमार राव व इतर सदस्य यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला.

तिसऱ्या व अंतिम टप्प्यांमध्ये नागरिकांनी असाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८७ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Wed Apr 19 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार ( ता. १८) रोजी शोध पथकाने ८७ प्रकरणांची नोंद करून ३७ हजार ८०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com