पावसात स्वच्छता दौडचा उत्साह द्विगुणित

– मनपाच्या “स्वच्छता दौड” ला उत्स्फूर्त प्रतिसाद

– नागपूरकरांनी केला ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ तेचा जागर

नागपूर :- देशातील इतर शहरांपेक्षा स्वच्छ, सुंदर, आणि स्वस्थ शहर म्हणून नावारूपाने यावे याकरिता संपूर्ण नागपूरकरांनी रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळी ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ तेचा जागर केला, रविवारी पहाटे बरसलेल्या पावसाने “स्वच्छता दौडचा” उत्साह द्विगुणित केला. यावेळी स्वच्छता दौड मध्ये सहभाग नोंदवीत ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवा वर्ग, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी मिळून नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ शहर साकारण्याचा निर्धार केला.

स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या स्वच्छता पंधरवड्यातील “स्वच्छता ही सेवा” या अभियांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी सकाळी (ता: २२) मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे स्वच्छता दौड चे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, पोलीस उपायुक्त निमित गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवित स्वच्छता दौडची सुरूवात केली.

याप्रसंगी मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त सर्वश्री. प्रमोद वानखेडे, श्याम कापसे, नरेंद्र बावनकर,विजय थूल, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह श्रीमती डॉ. अनुश्री अभिजीत चौधरी, रेल्वे अधिकारी काशिनाथ पाटील, स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, यांच्यासह माजी सैनिक, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे जवान, अग्निशमन विभागाचे जवान, मनपाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागरिकांचा उत्साह वाढवीत आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, डॉ. अनुश्री चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल पोलीस उपायुक्त निमित गोयल, रेल्वे अधिकारी काशिनाथ पाटील यांनी पाच किलोमीटर ची दौड पूर्ण केले. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित दौड यशस्वी केली.

स्वच्छता दौडच्या सुरुवातील पवन मंगोली आणि चमूने झूम्बाचे प्रात्यक्षिक करून दाखवीले, झुम्बा च्या संगीतावर उपस्थितांनी ठेका धरला, जस जसे संगीत वाढत होते, तस तसा उपस्थितांचा उत्साहात वाढ होत होती. नंतर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मेघगर्जनेसह मनपा मुख्यालयातून “स्वच्छता दौड” ला सुरुवात झाली. मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवताच पावसाची तमा न बाळगता समस्त धावपटू निघाले, यावेळी पावसाने त्याच्या उत्साहात भर घातली, भारत माता की जय च्या जय घोषात दौड विधान भवन चौकात होत, प्रधान डाक घर, लेडीज क्लब चौक, मोहमद रफी चौक, जापनीस गार्डन चौक होत तिरपुडे महाविद्यालयासमोर पोहोचली, येथे प्रथम १५० धावपटूंना बॅच देण्यात आले. मग विदर्भ क्रिकेट स्टेडियम होत मनपा मुख्यालयात दौडची सांगता झाले, येथे मान्यवरांच्या हस्ते प्रथम आलेल्या १५० धावपटूंना पदक व भेटवस्तू देण्यात आले.

उपस्थितांना मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वच्छता दौड मध्ये सक्रीय सहभाग नोंदाविल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले, तसेच स्वच्छ आणि सुंदर नागपूर साकारण्यासाठी स्वच्छता ही सेवा अभियानात मोठ्या संख्येत सहभाग नोंदवीत अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले. तर अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी स्वच्छतेचे संस्कार प्रत्यक्ष उतरवीत एक दक्ष नागरिक होण्याचे कर्तव्य पूर्ण करा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे. आमोद यांनी केले.

१३ महिन्याची मैथिली तर ७५ वर्षीय डोमा चाफले ठरेले विजेता

स्वच्छता दौडचे विजेत्यांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व इतर मान्यवरांच्या हस्ते परितोषिक प्रदान करण्यात आले. यात अवघ्या १४ मिनिटे ५० सेकेंदात दौड पूर्ण करणारा गौरव खोडतकर प्रथम ठरला, १५ मिनिटे १२ सेकंदात दौड पूर्ण करणारा प्रणय माहोले द्वितीय स्थानी पटकाविले, तर एडी महाविद्यालयाचा अजित बेंडे तृतीय स्थानी राहिला, तर उत्कृष्ट वेशभूषासाठी १३ महिन्याच्या मैथिली लांजेवार हिला पुरस्कृत करण्यात आले. युवा धावपटू म्हणून सात वर्षीय स्वरूप भट याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय स्वच्छतेसह नागपूरला सुंदर साकारण्याचा संदेश देणारे ७५ वर्षीय ज्येष्ठ धावपटू डोमा श्रावण चाफले यांनी देखील दौड पूर्ण केली. याकरिता त्यांना ज्येष्ठ धावक म्हणून पुरस्कृत करण्यात आले. याशिवाय पंकज टाकोणे आणि कुटुंब यांना कुटुंब स्पर्धक म्हणून तर आरपीटीएस च्या चमूला ग्रुप स्पर्धकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टिम कैट नागपुर की तरफ से बी सी भरतीया का सत्कार

Mon Sep 23 , 2024
नागपूर :- देश में व्यापारियों की शीर्ष संस्था कॉन्फ़िडरेशन ऑफ़ आल इंडिया टडर्स के नागपुर में सम्पन्न हुए चुनाव में बी सी भरतीया राष्ट्रीय अध्यक्ष और प्रवीण खंडेलवाल राष्ट्रीय महामंत्री एमेरिटस चुने गए। नागपुर के होटल अशोक लक्ष्मी नगर में देशके विभिन्न राज्यों के शहरों से आए व्यापारीनेताओ ने चुनाव में हिस्सा लिया। इसमें राष्ट्रीय कार्यकरणी का चयन हुआ। इसी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com