देशात यावर्षी एकूण 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज

– गेल्या 5 वर्षांतील सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी 211.00 लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार

नवी दिल्‍ली :- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष 2023-24 साठी प्रमुख कृषी उत्पादनांचा तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे.गेल्या कृषी वर्षापासून, उन्हाळी हंगाम रब्बी हंगामापासून विलग करण्यात आला असून तो तिसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणून, लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पन्नाच्या या आगाऊ अंदाजामध्ये खरीप, रबी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामाचा समावेश करण्यात आला आहे.

प्रामुख्याने राज्य कृषी सांख्यिकी अधिकाऱ्यांकडून (एसएएसएएस) मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अंदाज तयार करण्यात आला आहे. हाती आलेल्या आकडेवारीची वैधता तपासून, दूरस्थ संवेदक प्रणाली, साप्ताहिक पीकविषयक हवामान निरीक्षक गट आणि इतर संस्थांकडून मिळालेल्या माहितीशी ती जोडण्यात आली. त्याबरोबरच, हा अंदाज तयार करताना, वातावरणाची स्थिती, पूर्वीचे कल, दरातील चढउतार, मंडयांमध्ये कृषी उत्पादनांचे आगमन इत्यादी घटक देखील विचारात घेण्यात आले.

विविध पिकांच्या उत्पादनांचे तपशील खाली दिले आहेत:

एकूण अन्नधान्य – 3288.52 लाख टन

तांदूळ -1367.00 लाख टन

गहू – 1129.25 लाख टन

मका – 356.73 लाख टन

श्री अन्न– 174.08 लाख टन

तूर – 33.85 लाख टन

हरभरा – 115.76 लाख टन

एकूण तेलबिया– 395.93 लाख टन

सोयाबीन – 130.54 लाख टन

रेपसीड आणि मोहरी– 131.61 लाख टन

ऊस– 4425.22 लाख टन

कापूस – 325.22 लाख गासड्या (प्रत्येकी 170 किलो)

ताग – 92.59 लाख गासड्या (प्रत्येकी 180 किलो)

यावर्षी देशात एकूण 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज असून हे उत्पादन,वर्ष 2022-23 मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. या अंदाजानुसार, गेल्या 5 वर्षांत (वर्ष 2018-19 ते 2022-23 मध्ये) झालेल्या 3077.52 लाख टन सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी 211.00 लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार आहे.

खरीपातील पीक उत्पादनाचे अंदाज तयार करताना, पीक कापणी प्रयोगांवर (सीसीईएस) आधारित उत्पन्न देखील विचारात घेतले आहे.

आधीच्या अंदाजांसह, वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजाचे तपशील upag.gov.in येथे उपलब्ध आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग क्रिकेटपटूंनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठांच्या मैदानावर सराव करू देण्याची मागणी

Wed Jun 5 , 2024
मुंबई :- व्हीलचेअर क्रिकेट चमूच्या सदस्यांनी नीलोत्पल मृणाल यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. व्हीलचेअर क्रिकेट खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना मुंबई तसेच राज्यातील इतर सार्वजनिक विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या मैदानावर सराव करु द्यावा, या दृष्टीने विद्यापीठांना सूचना कराव्या अशी मागणी यावेळी दिव्यांग खेळाडूंनी केली. अनेक दिव्यांग खेळाडू व क्रिकेटपटू गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील असून खासगी क्लब / जिमखाना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com