रामटेक :- दिनांक 4 फेब्रुवारी – पत्रकार संघाचा चौथा स्तंभ जागृत व गोरगरीबांना न्याय देण्यासाठी, रामटेक येथे भारतीय प्रगतिशील पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली.
पत्रकारांची विशेष सभा रामटेक येथे घेऊन पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी, पत्रकार संघाचे कार्यालय, पत्रकार संघामार्फत विविध उपक्रम व समाजोपयोगी कार्य करून पत्रकारांतर्फे आपले दायित्व पार पाडण्याचे काम करण्यात येईल. यासाठी अनुभवी व नवोदित सर्व पत्रकार एक दिलाने काम करून, पत्रकार संघ समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचे कार्य करतील.
पत्रकारांच्या विशेष सभेमध्ये पत्रकार संघाला नाव देणे, राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे, पत्रकार संघाचे रजिस्ट्रेशन करणे इत्यादी सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण मेंघरे यांचे अध्यक्षतेखाली सभा घेऊन, भारतीय प्रगतिशील पत्रकार संघाची कार्यकारिणी एकमताने घोषित करण्यात आली.
सभेमध्ये भारतीय प्रगतिशील पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार नत्थूजी रामेलवार यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी कार्तिक उराडे, महासचिव पदी राहुल पिपरोदे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
पत्रकार संघाचे सदस्य पदी लक्ष्मणराव मेंघरे, रामानंद अडामे, अविनाश भोगे, नंदकिशोर पापडकर, संकेत निंबेकर, गणेश बुराडे, राहुल हटवार, कोदामेंढीचे शैलेश वाघमारे, राहुल चौधरी, कवीश्वर खडसे इत्यादी पत्रकारांची सदस्य पदी निवड करण्यात आली.
पत्रकार संघाचे सल्लागार व मार्गदर्शक पदी ऍडव्होकेट आनंद गजभिये, ऍडव्होकेट पियुष सायरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार संघाचे अध्यक्ष नत्थूजी रामेलवार, उपाध्यक्ष कार्तिक उराडे, महासचिव राहुल पिपरोदे यांचे अभिनंदन प्रशांत किंमतकर, सुखराम उचिबगले, नगरधन चे सुरेंद्र बिरेनवार, मनापूर चे उमाकांत पोफळी, अजनीचे सरपंच मनोज लील्हारे, बनपुरी चे नंदलाल बावनकुळे, मुसेवाडी चे कृष्णा बादुले, बोरी चे विजय बरबटे, पोलीस पाटील संघटना, अंगणवाडी संघटना, तहसील कार्यालयासमोरील दुकानदार संघटना, रामटेक तथा वाहिटोला येथील बेरोजगार युवक संघटना इत्यादी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. पत्रकार सभेला उपस्थित मान्यवर पत्रकारांचे आभार संकेत निंबेकर यांनी मानले.