जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

नागपूर :- राज्यातील सर्व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्विकारून त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचीत कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याकरीता विभागीयस्तरावर मुख्यमंत्री सचिवालयाची स्थापना करण्यात आलेली असून सदर कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यात येत आहे.

त्याच धर्तीवर सामान्य नागरीकांना त्यांचे प्रश्न जिल्हास्तरावर सोडविण्याकरीता सदर कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याकरीता ग्रामिण भागातील नागरीकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून त्याचा निपटारा करण्याकरीता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचा नागरीकांनी अधिकाधिक फायदा घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, यांनी आवाहन केले आहे. कक्षाकरीता विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत शेतकऱ्यांनी आधार व बँक क्रमांक तत्काळ जमा करावे - जिल्हाधिकारी

Sat Dec 24 , 2022
नागपूर : सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक तत्काळ संबंधित साझ्याच्या तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप पारदर्शकरित्या आणि जलद व्हावे. यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!