नागपूर :- शहरातील प्रसिद्ध अंबाझरी आणि गोरेवाडा धरण सुस्थितीत ठेवण्यासाठी तसेच धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेत अंमलबजावणी करुन घेण्यासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे ‘धरण सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सचिव जलसंपदा विभाग यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्राप्त सुचनेनुसार मनपाद्वारे ‘धरण सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सध्या अंबाझरी धरण आणि गोरेवाडा धरण हे शहरात मनपाच्या अधिनस्थ आहेत. त्यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी, धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेत अंमलबजावणी करुन घेण्यासाठी धरण सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली असून, मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यात एस.ए. वाईकर, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा), राजेश गुरनुले, यांत्रिकी अभियंता,आर.एल. पंचभाई, उप अभियंता (स्थापत्य) एम.पी. संगीडवार,शाखा अभियंता यांचा समावेश आहे. धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेणे/ निर्णयाची अंमलबजावणी करुन घेणे/धरण सुस्थितीत ठेवणे या सर्व बाबींची जबाबदारी धरणमालक/धरण सुरक्षा कक्ष यांची राहणार आहे.
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधिक्षक अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार,धरण सुरक्षा संघटना नाशिक यांच्यातर्फे या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्व पावसाळा व उत्तर पावसाळा याप्रमाणे वर्षातून दोनदा तपासणी करण्यात येऊन सदरचा अहवाल या विभागास सादर करण्यात येतो. तथापी, धरण बांधकाम व देखभाल दुरुस्ती तसेच संलग्न कामे करण्याकरीता मनपाकडे तज्ञ उपलब्ध नसल्याने मनपातर्फे अहवाला अंतर्गत नमुद कामे ही या कामात तज्ञ पाटबंधारे विभागास ठेव तत्वावर करण्यास्तव विनंती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.