– आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली नागनदी प्रकल्पाची पूर्ण माहिती
नागपूर :- राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (13 फेब्रुवारी) रोजी नागनदी प्रकल्पाचा मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात आढावा घेतला.
यावेळी पर्यावरण विभागच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अति. आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्याय, उपायुक्त विजया बनकर, विजय देशमुख, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मनोज तालेवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, श्रीकांत वायकर, नागनदीचे तांत्रिक सल्लागार मो. इजराईल, प्रोजेक्ट मॉनेटरींग कॉन्सीलचे प्रकल्प व्यवस्थापक अबु, उपप्रकल्प व्यवस्थापक डॉ. श्रीनिवास राव, आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ अजित सवदी, प्रोक्युरमेंट तज्ज्ञ पूर्णचंद्र राव यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मा. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वागत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केले, तर प्रधान सचिव विनिता सिंगल यांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नागनदी प्रकल्पाची पूर्ण माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना दिली. त्यांनी मंत्री महोदयांना सांगितले की, नागनदी प्रकल्पावर केंद्र राज्य, आणि मनपा यांच्या सहभागातून एकून 1926.99 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याकरिता केंद्र सरकारतर्फे 1156.14 कोटी, राज्य सरकारतर्फे 481.73 कोटी, मनपा 289.02 खर्च करणार आहे. या प्रकल्पावर जपानची जायका कंपनी मदत करीत आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी नागनदी प्रकल्प वेळेवर पुर्ण करण्याचे सुचित केले.
नागनदीवर एसटीपी वाढ करणे आणि अद्यावतीकरण, पाण्याची गुणवत्ता राखणे, नदीमधील प्रदुषण कमी करणे, उत्तर आणि मध्य भागात सिवरेज लाईन नेटवर्क बदल करणे, नवीन सिवरेज लाईन टाकणे, प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करणे, जैवविविधता सुधारणे, लोकांचे आरोग्य सुधारणेसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय महानगरपालिकातर्फे 5 वर्षात पाच पॅकेजमध्ये नागनदी पुनरुजीवन करण्यात येणार असल्याचेही डॉ. अभिजित चौधरी यांनी माहिती दिली. यावर मंत्री महोदय पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.